विनय हर्डीकर : निपाणीत बहुआयामी पुस्तकाचे प्रकाशन
निपाणी : अपयश आले तर पुन्हा संघर्ष करा सगळेच संघर्ष यशस्वी होतात असे नाही, ते पुन्हा पुन्हा करावे लागतात. भारत मातेची ओळख देशातील विविध प्रश्नांवर होते. भारत माता हे रनकुंड आहे. आता विचारांपेक्षा तंत्रज्ञानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. भौगोलिक सीमारेषा राहिलेल्या नाहीत. तंत्रज्ञानामधील नवीन शैली आल्यामुळे विचार हद्दपार होत आहेत का, असा सवाल सामाजिक चळवळींचे अभ्यासक विनय हर्डीकर यांनी उपस्थित केला.
ते निपाणी येथे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, समाजातील सामान्यांशी नाळ जोडलेले पत्रकार ’रमेश शिपूरकर’ यांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व यावर भाष्य करणारे शोभना शिपूरकर लिखित, ’बहुआयामी’ हे महत्वाचे पुस्तक साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम आपटे होते. हर्डीकर म्हणाले, समाजासमोर अनेक प्रश्न आहेत. कोरोनामुळे विकसित समाजामधील जास्त माणसे मयत झाली हा माहिती प्रसारणावर जास्त विश्वास असल्याने गोंधळ उडाला आहे. कार्यकर्त्यांचा बुद्धीभेद करणार्यांना वेचून बाहेर ठेवले पाहिजे. पुर्वी भेद स्पष्ट होते. आता गुंतागुंत वाढली आहे. भेद निश्चित करणारी रेषा अस्पष्ट होत आहे. भारत माता कोण आहे, काय आणि कशी आहे ते समजावून घेतले पाहिजे. रमेश शिपुरकर यांचे समाजकार्यात योगदान होते. नव्या काळातील प्रश्न समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक बांधिलकी असणार्या कार्यकर्त्यांची गरज आहे.
यावेळी साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांनी, निपाणी हे गाव शेतकरी आंदोलनामुळे परिचित झाले. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांबरोबर तालुका व जिल्हा पातळीवरील नेत्यांची चरित्रे प्रसिद्ध झाली पाहिजेत. सर्व सामान्य माणसे आणि प्रमुख नेते यांना जोडणार्या दिव्यांची आत्मचरित्रे प्रसिद्ध होण्याची गरज आहे. यासाठी नफा-तोटा बाजूला ठेवून ही ही पुस्तके प्रकाशित करण्याची गरज असल्याचे सांगितले. लेखिका शोभा शिरपूरकर, राम आपटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी आमदार श्रीपतराव शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे, राजा शिरगुप्पे, व्यंकाप्पा भोसले, बारदेस्कर, के. एम. पाटील, विनोद कुलकर्णी, गणी पटेल, निरंजन कमते, रवींद्र मुतालीक, आय. एन. बेग, एम. ए. नाईक, सुधाकर सोनाळकर, प्रा. सुरेश शिपुरकर, डॉ. सुनीता देवर्षी, डॉ. प्रशांत कुलकर्णी, प्रा. आनंद संकपाळ, प्रा.शरद कांबळे, प्रमोद कांबळे, सुधाकर पोतदार, एम. पी. कुलकर्णी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी आभार मानले.
Check Also
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशनात आंदोलन
Spread the love राजू पोवार ; रयत संघटनेची गांधी भवनात बैठक निपाणी (वार्ता) : ओला …