निपाणी (वार्ता) : येथील अक्कोळ रोड वरील सावंत कॉलनी मधील दोघे युवक १४ हे पासून बेपत्ता झाल्याची तक्रार योहान गुलाब इमॅन्युएल यांनी निपाणी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. जोसेफ योहान इमॅन्युएल (वय १७) आणि अखिलेश कमलेश अंतवाल (वय २२) अशी बेपत्ता झालेल्या दोघांची नावे आहेत.
इमॅन्युएल आणि अखिलेश हे दोघेही १३ रोजी योहान यांनी घर आणि हॉटेलमध्ये ठेवलेली १ लाख २० हजाराची रक्कम घेऊन घराबाहेर पडले आहेत. या दोघांचा नातेवाईक व मित्रमंडळीकडे चौकशी करूनही ते सापडलेले नाहीत. त्यामुळे योहान यांनी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात याबद्दलची फिर्याद दिली आहे. जोसेफ याचा लांबट चेहरा,५ फुट ८ इंच उंची, गोरा रंग, लांबट नाक असून अंगात निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि बरमोडा आहे. त्याला कन्नड हिंदी मराठी इंग्रजी भाषा समजते. तर अखिलेश याचा लांबट चेहरा, गोरा रंग ५ फुट २ इंच उंची आहे. अंगात पॅन्ट आणि टी-शर्ट आहे. त्याला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. वरील वर्णनाची व्यक्ती आढळल्यास बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी यांनी केले आहे.