बोरगाव नगरपंचायत निवडणूक : मंत्री जोल्ले, उत्तम पाटील यांच्यात काटे की टक्कर
निपाणी : बोरगाव नगरपंचायतीच्या निवडणुक 27 डिसेंबरला होणार असून या अनुषंगाने शहरातील दोन्ही प्रमुख गटांची तयारी सुरू झाली आहे. सतत राजकीय हालचालीचे केंद्र असलेल्या बोरगाव नगरपंचायत ताब्यात असणे खूप महत्त्वाचे आहे. सध्या सुरू असलेल्या हालचालीवरून शहर विकास आघाडी विरुद्ध भाजपा असे लढत होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. त्यामुळे मंत्री शशिकला जोल्ले आणि युवा नेते उत्तम पाटील यांच्यात काटे की टक्कर होणार आहे.
बोरगाव शहरात एकूण 17 प्रभाग आहेत. या प्रभागांपैकी 13 प्रभागांमध्ये शहर विकास आघाडीचे युवा नेते उत्तम पाटील गटाचे नगरसेवक निवडून आले होते. तर 4 नगरसेवक हे भाजपाचे होते निकालानंतर उत्तम पाटील गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
सहकार नेते रावसाहेब पाटील यांनी बोरगाव नगरपंचायतीमध्ये आपल्या विकासकामात एक वेगळी ओळख करून दिली आहे. त्या अनुषंगाने युवानेते उत्तम पाटील यांनी राज्यभर दौरा करून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी खेचून आणत आहेत. गेल्या साडेचार वर्षात सुमारे 25 कोटीहून अधिक विकासकामे शहरात राबविले आहेत. असे असले तरी या निवडणुकीत शहर विकास आघाडी विरोधात भाजप थेट लढत होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण मंत्री शशिकला जोल्ले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीचे तयारी दर्शविले जात असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येणारी निवडणूक ही रंगतदार होणार आहे. पण भाजप कोणाशी हातमिळवणी करेल याबाबत अजून स्पष्टता नाही.
गेल्या निवडणुकीत भाजप हा पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविला होता. मात्र या निवडणुकीत भाजप अपक्ष म्हणून निवडणुक लढविल्यास किंवा काही पुढार्यांशी हात मिळवून निवडणूक लढविण्यास ही निवडणूक दूरंगी होणार शक्यता आहे. मात्र सध्या परिस्थिती पाहता शहर विकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत वर्तवले जात आहे.
माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले गटाकडून निवडणुकीबाबत अजून कोणतीच हालचाली सुरू झाल्या नसल्याचे दिसत आहे. मात्र येणार्या काळात हावले गटाकडून उमेदवार उभारल्यास ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. निवडणूक तिरंगी झाल्यास भाजप पक्षाचे नुकसान होणार आहे. कारण हावले गट सक्रिय झाल्यास पाटील व हावले गटात चुरस वाढणार आहे. ही चुरस वाढली तरीही मतदार आपल्या नेत्याचेच उमेदवाराला निवडून देणार असतात. त्यामुळे स्थानिक नेत्यांना या निवडणुकीत अधिक महत्त्व दिसत आहे. येणार्या वातावरणावरून हे स्पष्ट होणार आहे. कारण हावले गटाने भाजपाची हात मिळवणे केल्यास ही लढत दुरंगी होणार आहे.
बोरगावकरांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास आणि एक हाती दिलेली सत्ता या सत्तेचा पुरेपूर वापर करीत युवानेते उत्तम पाटील यांनी शहराचा कायापालट केला आहे आणि हीच विकासकामे या निवडणुकीत त्यांना उपयोगी होणार आहेत. तर मंत्री शशिकला जोल्ले यांनी भाजप सरकारच्या विविध योजना व त्यांनी राबवलेल्या बोरगाव शहरात कामे, समुदाय भवन, रस्ते यासह अनेक कामांची माहिती या ठिकाणी देणार आहेत. असे असले तरीही निपाणी राजकारणाचे सत्ताकेंद्र असलेल्या बोरगाव नगरपंचायतीत आपली सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच नेते मंडळीची हालचाल सुरू झाली आहे. तर काहींनी आतापासूनच व्हाट्सअप, फेसबुकवर आपले पोस्ट वायरल करीत आहेत. भावी नगरसेवक, सच्चा कार्यकर्ता, याबरोबरच विविध शीर्षक देऊन पोस्ट करण्याचे दिसत आहेत.
—-
काट्याची टक्कर होणार
गेल्यावेळी सहा महिने आधीच रणांगण सुरू झाल्याचे चित्र होते. कोरोना महामारी व अन्य कारणांनी विरोधी गटाला सत्ताधारी गटाविरूद्ध रान उठवता आलेली नाही. त्यामुळे सत्ताधारी गटाला सध्या अनुकूल वातावरण दिसत आहे. मंत्री शशिकला जोल्ले यांनी आपला गट सक्रिय ठेवला आहे. 17 प्रभागात चार-पाच प्रभाग सोडले तर सर्वच ठिकाणी काट्याची टक्कर होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.