निपाणी : निपाणी शहराला गेल्या चार दिवसापासून केला जाणारा पाणीपुरवठा हा हिरवा, पिवळा रंगाचा, घाणेरडा वास असे अशुद्ध पाणी नागरिकांना दिले जात आहे. या पाण्याच्या वापरामुळे नागरिकांना घसा दुखणे, जुलाब लागणे तर काही नागरिकांना अंगाला खाज, पुरळ उठणेचा त्रास होत असुन या कारणामुळे त्रस्त झालेले अनेक लोक आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जात आहेत. पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जैन इरिगेशन कि निपाणी नगरपालिकेची हेच समजत नाही. जरी जबाबदारी कोणाचीही असुदे पण ज्या प्रभागाचे नगरसेवक आहेत त्यांनी तरी ही जबाबदारी कर्तव्य म्हणून अंगावर घेतली पाहिजे, असे नागरिकांना वाटते. शुध्द पाणी पुरवठा, पुरविण्याची जबाबदारी ही पालिका प्रशासनाची आहे. त्यावर अंकुश हा नगरपालिकेचा हवा, अशी चर्चा शहरात सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta