माजी विद्यार्थ्यांनी केला आदरांजलीचा कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : प्रत्येकाला जीवनात प्रसंगानुसार अनेक भूमिका वठवाव्या लागतात. त्या भूमिका साकारताना नेहमी कष्ट घ्यावे लागतात. पण त्याची माहिती इतरांना कधीही मिळत नाही. अशाच प्रकारच्या माजी प्राचार्या वृंदावन कशाळीकर होत्या. त्या शिस्तीच्या असला तरी सर्वांच्या सहकार्याने त्याने ज्ञान दिले आहे. त्यांनी परमार्थिक जीवन जगण्यासह समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे चांगल्या लोकांच्या स्मृती आणि प्रेरणा नेहमी सोबत राहतात, असे मत माजी प्राचार्य माधव कशाळीकर यांनी व्यक्त केले. देवचंद महाविद्यालयाच्या निवृत्त प्राचार्या दिवंगत वृंदा कशाळीकर यांचा येथील माजी विद्यार्थ्यातर्फे प्रथम स्मृतिदिन पार पडला. त्याप्रसंगी माधव कशाळीकर बोलत होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दिवंगत वृंदा कशाळीकर यांच्या प्रतिमेचे पूजनसह दीप प्रज्वलन झाले.
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी, विद्यार्थी हा नम्र असावा तर शिक्षक हा तळमळीने शिकवणारा असला पाहिजे. वृंदा कशाळीकर यांनी सामाजिक भावनेने आपले ज्ञानदानाचे कर्तव्य पार पाडले आहे.याशिवाय विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक अडचणीवर मात करून त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिल्याचे सांगितले. याशिवाय प्राचार्या जी. डी. इंगळे, प्रा.जे.डी. कांबळे, डॉ. प्रज्ञा चिटणीस, नारायण यादव, आशाराणी चव्हाण, संजय माने बाळासाहेब कळसकर राजू खराडे, भाग्यश्री सूर्यवंशी प्रा.व्ही.बी. घाटगे, प्रा. आनंद संकपाळ, प्रा कांचन बिरनाळे, नंदू मोहिते यांच्यासह माजी विद्यार्थी व मान्यवरांनी प्राचार्य वृंदा कशाळीकर यांच्या कार्याचा आढावा घेतला.
त्यावेळी दिवंगत प्राचार्या वृंदा कशाळीकर यांच्या नावे सोशल फाउंडेशन स्थापन करून त्याद्वारे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यात येणार आहेत. या फाउंडेशनसाठी माजी विद्यार्थी संजय लाखे यांनी २५ हजाराच्या देणगीचा धनादेश माधव कशाळीकर यांच्या हस्ते फाउंडेशनच्या सचिवाकडे सुपूर्द केला. तसेच सायली संजय जाधव या विद्यार्थिनींनी प्राचार्या कशाळीकर यांच्या प्रतिमेचे स्केच काढून कशाळीकर कुटुंबीयांना भेट दिली.
कार्यक्रमास निवृत्त प्रा. आर. वाय. चिकोडी, प्रा. एस.टी. नाईक, रवी साळुंखे, प्रा.एन. डी.जत्राटकर, रमेश पै, प्रकाश बाडकर, प्रा. नानासाहेब जामदार, संगीता पाटील, भाग्यश्री सूर्यवंशी, सुनिता रजपूत, सुनिता पवार, प्रमिला खापे, अशाराणी जाधव, अमिता चिकोडे, सुनीता पट्टणशेट्टी, शारदा अजरी, संजय माने प्रशांत घोडके, आंध्रेश सुतार, राजू खराडे, सुधीर पोवार, संजय डावरे यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते. रूपाली सांगावकर यांनी सूत्रसंचालन केले. तर संजय लाखे यांनी आभार मानले.