नगरपालिकेचा उपक्रम : परिसरातून तलावत येणाऱ्या पाण्याला वाट
निपाणी (वार्ता) : यंदाच्या उन्हाळ्यात एकही वळीव पाऊस झालेला नाही. शिवाय जून महिन्यातील पंधरा दिवस उलटूनही माणसं पावसाने निपाणी परिसरात हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारा जवाहर तलावाने तळ घातल्याने पाणीपुरवठा गंभीर बनला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या पावसामुळे तलावात पाणीसाठा व्हावा या उद्देशाने नगरपालिका प्रशासनातर्फे नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी आणि पाणीपुरवठा विभागाचे सुपरवायझर प्रवीण कणगले यांच्या नेतृत्वाखाली तलाव परिसरातील झाडाझुडपांची स्वच्छता केली जात आहे.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये शिरगुप्पी आणि परिसरातील ओढ्यातून जवाहर तलावात पाणी येते. पण यावर्षी अजूनही मान्सूनला प्रारंभ न झाल्याने तलावातील पाणी पातळी झपाट्याने खालावली आहे. आता मान्सून सक्रिय होणार असल्याने परिसरातून येणाऱ्या ओढ्यातील के कचरा आणि झुडपे जेसीबीद्वारे काढली जात आहेत. त्याशिवाय शहरातील अनेक नागरिकांनी घरातील टाकाऊ वस्तु जवाहर तलाव परिसरात असलेल्या ओढ्यामध्ये टाकले आहेत. विल्हेवाट लावली जात आहे.
तलावाच्या तिन्ही बाजूला अनेक झाडे झुडपे व वेली वाढले आहेत. त्याचीही स्वच्छता केली जात आहे. शिरगुप्पीकडून येणाऱ्या ओढ्यामध्ये काटेरी झुडपे वाढले असून त्यामुळे तलावात पाणी जाण्यास अडचण निर्माण होते. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेऊन पाऊस सुरू होण्यापूर्वीच या ओढ्यासह परिसरातून पाणी येणाऱ्या सर्वच वड्यांची स्वच्छता केली जात आहे. त्यामुळे पाऊस सुरू होताच तलावात चांगल्या प्रमाणात पाणीसाठा होणार आहे. नगरपालिका प्रशासनाने पावसापूर्वीच हे काम हाती घेतल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
——————————————————————-
‘पावसाळ्यामध्ये शिरगुप्पीसह परिसरातून पावसाचे पाणी जवाहर तलावात येत असते. पण ओढ्यासह परिसरात वाढलेल्या काटेरी झुडपामुळे पाणी पूर्ण क्षमतेने तलावात येण्यास अडचण निर्माण होते. त्यासाठी पाणी येणाऱ्या मार्गावरील कचऱ्यासह झाडाझुडपांची स्वच्छता केली जात आहे.’
-जगदीश हुलगेज्जी, नगरपालिका आयुक्त, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta