निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास कांबळे यांच्या पत्नी सुरेखा कांबळे यांना बेळगाव येथील राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी यांच्याकडून नुकतेच पी.एचडी पदवी प्रदान करण्यात आली.
सुरेखा कांबळे या राज्यशास्त्र विभागात ‘मागासवर्गीय महिलांचे राजकीय शिक्षण व संशोधन’ या विषयावर त्यांनी प्रबंध लेखन केले होते. याची सविस्तर माहिती त्यांनी राणी चन्नम्मा विद्यालयास सादर केली होती. सुरेखा यांनी सादर केलेल्या अहवालाचे पाहणी करून बेळगाव येथील राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाने त्यांना पीएचडी पदवी प्रदान केली. त्यांना राज्यशास्त्री विभागाच्या प्रा. कमलाक्षी तडसद यांचे मार्गदर्शन लाभले.
सुरेखा कांबळे यांचे दहावी बारावी शिक्षण बेळगाव येथे पूर्ण झाले. त्यानंतर एम.ए. पदवीचे धारवाड येथून शिक्षण घेतले. एम ए शिक्षण घेताना त्यांनी कन्नड विषयात सहा वेळा सुवर्णपदक मिळवले आहे. जिद्द व चिकाटीने शिक्षण पूर्ण करून ध्येय ठेवल्याने त्यांनी ही पीएचडी पदवी मिळवली आहेत. त्यांच्या या यशाबद्दल बोरगाव परिसरात कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta