निपाणी-(वार्ता) : गेल्या चार महिन्यापासून निपाणी आणि परिसरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. जून महिन्यातील पंधरा दिवस संपले तरीही माणसं पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक बाबुराव मलाबादे, सोमनाथ शिंपुकडे आणि विजय मगदूम यांनी येथील चिकोडी रोडवरील समाधी मठातील गोशाळेला एक टन हिरव्या चाऱ्याची देणगी दिली. त्यामुळे गोशाळेतील गाईंना दिलासा मिळाला आहे.
काही दिवसापूर्वी मलाबादे व सहकाऱ्यांनी समाधी मठातील गोशाळेला भेट दिली होती. त्यावेळी येथील गोधनासाठी चाऱ्याची कमतरता असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे वरील तिघांनी एकत्र येऊन या गोशाळेला भिवशी येथील एक टन हिरवा चारा उपलब्ध केला. यावेळी प्राणलिंग स्वामी यांनी, गेल्या काही वर्षापासून गोधनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आपण व संवर्धन करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या उन्हाळ्यात चारा टंचाई भासत असताना वरील मंडळींनी दिलेली चाऱ्याची देणगी गोशाळेसाठी महत्त्वाची ठरल्याचे सांगितले.