
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात पावसाने ओढ ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवाय रात्रीच्या उकाड्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये चोरट्यांनी येथील जवाहर तलाव रस्त्यावरील बसव नगर मधील नंदू राजगिरे यांच्या घरी चोरी झाल्याचे घटना शुक्रवारी (ता.१६) सकाळी उघडकीस आली या घटनेत साडेतीन तोळ्याच्या दागिन्यासह रोख तीस हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. त्यामुळे बसवा नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनास्थळावर मिळालेली अधिक माहिती अशी, येथील जवाहर तलाव रस्त्यावरील बसवनगरमध्ये नंदू राजीगरे हे कुटुंबीय स्वमालकीच्या तीन खोल्यामध्ये वास्तव्यास आहेत. नेहमीप्रमाणे शनिवारी (ता.१७) रात्री अकरा वाजता सुमारास ते स्वयंपाक खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून आतील बाजूस असलेल्या दोन खोल्यांमध्ये कुटुंबीय झोपी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरांनी तलाव रोडवरील मुख्य रस्त्या लगतच्या खोलीचा कडी कोंयडा उचकटून आत प्रवेश त्यांना स्वयंपाक घरात कोणीही नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या खोलीतील तीनही तिजोऱ्या चोरट्यांनी उचकटून धाडसी चोरी केली आहे. यावेळी चोरट्यांनी तिजोरी मधील सर्व साहित्य विस्कटून टाकून त्यातील साडेतीन डोळ्यांचे सोन्याचे दागिने तीस हजार रुपयावर डल्ला मारून पोबारा केला. चोरीची घटना समजताच शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दोन वेळा भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास चालू आहे.
सलग दुसऱ्या दिवशी चोरी
बसवा नगरातच सलग दुसऱ्या दिवशी चोरी झाल्याची घटना शनिवारी (ता.१८) उघडकीस आली. ही चोरी चौधरी नावाच्या कुटुंबात झाली आहे. मात्र या घरात चोरट्यांच्या हातात केवळ आठ दहा हजार रुपये सापडले आहेत. चौधरी कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. कुटुंबीयांनी पर गावी जाताना सर्व दागिने घेऊन गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta