विविध संस्थासह शाळेमध्ये योगा दिन
निपाणी (वार्ता) : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्राचार्या चेतना चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त एलकेजी पासून सर्वच विद्यार्थ्यांनी योगा सादर केला.
प्रारंभी संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी चेतना चौगुले यांनी मानवी जीवनात योगामुळे होणाऱ्या लाभांची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी दररोज योगा करण्याचे आवाहन केले. याशिवाय यंदा लांबलेल्या पावसामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रियांका भाटले यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती चवई यांनी आभार मानले.
येथील संत सेना भावनात योग शिक्षक प्रवीण पाटील यांनी आपल्या साधकांसहीत जागतिक योग दिन साजरा केला. यावेळी प्रवीण पाटील यांनी, जागतिक योग दिनाचे महत्व व योग साधनेचे फायदे यासंबंधी मार्गदर्शन केले. उपस्थित साधकांकडून योगासन, प्राणायाम, सूर्यनमस्कार, सूक्ष्म व्यायाम, योगिक- जॉगिंग, व ध्यान साधना असे अनेक प्रकार करून घेतले. क्रार्यक्रमास शंकर पाटील, राजन पवार, सचिन जाधव, उत्तम जगताप, सतीश येडुरे, प्रमोद माने, दयानंद आजन्नावर, रमेश कदम, आनंद सुर्यवंशी, विजय सूर्यवंशी, लिलाताई परमणे, संगिता माने, गीता शिंदे, पुजा कोळकी, शांता पवार, निर्मला अंकोशे, साजिदा पठाण
यांच्यासह साधक उपस्थित होते.
येथील वॉकर्स क्लब योगा केंद्रतर्फे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. शोभा वडगावे आणि जयंत दुधारकर यांच्या नेतृत्वाखाली साधकांनी विविध प्रकारची योगासने सादर केली. शिवाय वडगावे व दुधारकर यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट केले.
Belgaum Varta Belgaum Varta