निपाणी (वार्ता) : हिंदुराष्ट्र, धर्मनिष्ठ समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणे, ही काळानुसार सर्वोत्तम गुरुसेवाच आहे. हा संदेश देण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने महादेव मंदिर सांस्कृतिक भवन, महादेव गल्ली, निपाणी येथे सोमवारी (ता.३) सायंकाळी ५.३० वाजता गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदु धर्मातील अद्वितीय अशी श्रेष्ठ परंपरा म्हणजे ‘गुरु-शिष्य परंपरा’ आहे.
महोत्सवात श्री व्यासपूजन आणि भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन) होणार आहे. समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी मान्यवरांचे विचार तसेच ‘संवैधानिक आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प करा’ या विषयांवर मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. तरी हिंदूंनी या गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta