उत्तम पाटील; कुर्ली येथे एस. एस. चौगुले यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : आजचा विद्यार्थी व त्याची मानसिकता बदलली आहे. पालकांच्या वाढत्या अपेक्षा, बदलत चाललेले सामाजिक वातावरण मोबाईलचा अति वापर, यामुळे विद्यार्थी भरकटत चालला आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता असली तरी विद्यार्थ्यांच्या क्रयशक्तीला चालना देण्याची गरज आहे. भविष्याचा वेध घेतांना प्रतिभावंत विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकाची असल्याचे मत बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेचा यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एस. एस. चौगुले यांचा उत्तम पाटील यांच्या हस्ते मराठा भवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी वकील संजय शिंत्रे होते.
के. डी. पाटील यांनी स्वागत केले.
सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांनी एस. एस. चौगुले यांच्या कार्याचा उहापोह केला. सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना एस. एस. चौगुले यांनी, रयत शिक्षण संस्थेचा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यामुळेआपल्या कामाची व्याप्ती अधिक वाढली आहे. या पुरस्काराची रक्कम ही विद्यार्थ्यांच्या उपक्रमासाठी वापरणार असल्याचे सांगितले. अध्यक्ष संजय शिंत्रे यांनी, रयत शिक्षण संस्थेचा सर्वोच्च पुरस्कार हा कुर्ली गावासाठी भूषणावह असल्याचे सांगितले. याप्रसंगी विविध संघ संस्था यांच्यावतीने चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास पिकेपीएसचे अध्यक्ष अरुण निकाडे, श्रीनिवास पाटील, विश्वनाथ पाटील, अमर शिंत्रे, अजित पाटील, मनीषा पाटील, सागर चौगुले, विक्रम पाटील, शिवाजी चौगुले, वाय. टी. पाटील, सीताराम चौगुले, बी. जी. चौगुले, सिद्धेश्वर विद्यालय, दृष्टी कॉन्व्हेंट स्कूलचे शिक्षक, कुर्ली येथिल विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. राजेंद्र चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. टी. एम. यादव यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta