निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ येथील सन्मती विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा निमित्त गुरुवंदना कार्यक्र साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महावीर कलाजे तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक राजगोंडा पाटील, आर. जे. खोत उपस्थित होते.
मुख्याध्यापक एम. बी. कोल्हापुरे यांनी स्वागत केले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शिक्षकांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. अनुष्का नेजे हीने गुरुपौर्णिमेवरती चित्र प्रदर्शित केल्याने तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सिदनाळ, हुन्नरगी, जैनवाडी, बोळेवाडी येथील विद्यार्थ्याकडू पालकांची पादपूजा करण्यात आली. बाबू परीट व्ही. बी. पाटील, आर. जे. खोत, निवृत्त मुख्याध्यापक ऎ. एस. पाटील, महावीर कलाजे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमास वसंत शिंत्रे, एस. बी. बेळगुदरी, एस. एन. रायनाडे, पी. एम. तोटद, शितल मगदूम, ए. बी. नेजे, जी. आर. देसाई, दादा मगदूम, अण्णासाहेब पाटील यांच्यासह शिक्षक पालक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील व संचालक मंडळाचे मार्गदर्शन लाभले. किरण आवटे हिने सूत्रसंचालन केले. अनुष्का नेजे हिने आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta