निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मोठी बस्ती येथे सिद्धांत चक्रवर्ती, संस्कार शिरोमणी आचार्य रत्न श्री १०८ कुलरत्नभूषण महाराजांच्या चातुर्मास कार्यक्रमास रविवारी (ता.९) प्रारंभ झाला. हा कार्यक्रम पाच महिने चालणार असून या काळात विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती चातुर्मास समितीचे प्रमुख अभय भिवरे यांनी दिली.
‘कर्नाटक केसरी’ म्हणून परिचित असलेल्या श्री १०८ कुलरत्नभुषणजी याचा चातुर्मास प्रारंभ प्रसंगी रविवारी (ता.९) कलश स्थापना करण्यात आली. मंगळवारी (ता.१८ )अधिक मास प्रारंभ होणार आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, १६ ऑगस्टला विराचार्य स्मृतिदिन, १७ रोजी राजयोग, २३ रोजी श्री १००८ भगवान पार्श्वनाथ मोक्षकल्याणक दिन, ३० रोजी रक्षाबंधन व १५ सप्टेंबर रोजी शोडशकारण व्रत प्रारंभ होणार आहे. १७ सप्टेंबरला श्री १०८ शांतीसागर महाराज पुण्यतिथी महामहोत्सव, १९ रोजी पर्युषण पर्व सुरू होणार आहे. १ ऑक्टोबरला क्षमावाणी पर्व होणार असून या दिवशी मिरवणूक व २४ पालखी महोत्सव होणार आहे. १५ रोजी घटस्थापना, २२ रोजी जीवदयास्तमी, २३ रोजी महानवमी, २४ रोजी विजय दशमी दसरा महापर्व व २८ रोजी आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराज यांचा जन्मदिवस व गनिमी आर्यका श्री १०५ ज्ञानमती माताजी यांचा जन्म व दीक्षा दिवस कार्यक्रम होणार आहेत.
१० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी भगवान महावीर योग दिवस व ११ रोजी चातुर्मास विसर्जन होणार आहे. व १२ नोव्हेंबर चातुर्मासच्या अंतिम दिवशी रविवारी श्री १०८ भगवान महावीर तीर्थंकर यांचा निर्वाण कल्याण महामहोत्सव कार्यक्रम होणार आहे. याशिवाय प्रत्येक रविवारी महाराजांचे प्रवचन होणार आहे.
यावेळी नगरसेवक शरद जंगटे, संजय हवले, भाऊसाहेब बंकापुरे, भरत पाटील बाहुबली पाटील, डॉ. बी. एस. पाटील, जितेंद्र पाटील, बिपिन देसाई, महावीर पाटील, जितेंद्र अम्मान्नवर, शितल हवले, ऋषभ हवले, सुभाष नरवाडे, राजू कोत्तलगे, भरत नागावे, बाहुबली नागावे, दिलीप रोड , सुधाकर इण्डे, सम्मेद पाटील, डॉ. महावीर बंकापूरे, रोहिणी पाटील, सारिका पाटील, आशा पाटील, जिनेंद्र जंगटे, संदीप हावले, यांच्यासह श्रावक श्राविका उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta