आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर : अधिवेशनाच्या बोधचिन्हाचे अनावरण
निपाणी : दिवाण बहादुर अण्णासाहेब लठ्ठे यांनी स्थापन केलेल्या दक्षिण भारत जैन सभेला रचनात्मक कामातून सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सभेचे कामकाज पोहोचवले. एका राज्यासाठी किंवा एका जिल्ह्यासाठी सभेचे कामकाज मर्यादित न ठेवता कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दक्षिण भारत समाजिक पोहोचले पाहिजे, समाजाचा विकास झाला पाहिजे, आरोग्य शिक्षण व संस्कार याला महत्त्व मिळाले पाहिजे. यासाठी त्यांनी प्रयत्न केले असून त्यांच्यामुळेच आपले सभेचे कामकाज तळागाळापर्यंत पोहोचले असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केले.
दक्षिण भारत जैन सभेचे शंभरावे अधिवेशन भव्य रूपात 2022 साली सांगली येथे होणार आहे. यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. यासाठी बोरगाव अरिहंत सभागृहात नियोजित बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची उपस्थिती होती. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी अरिहंत सभागृह येथे शंभरावे अधिवेशनाचे बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सांगली येथे होत असलेल्या सभेच्या शंभरावे अधिवेशन हा ऐतिहासिक अधिवेशन व्हावा यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. अधिवेशनावेळी प्रारंभी व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता व पर्यावरण रक्षण दिंडी सोहळा होणार आहेत. कृषी, शिक्षण, संस्कार, आरोग्य व रोजगार या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आली आहे. दक्षिण भारत जैन सभेची भट्टारक पीठे ही श्रद्धास्थान असून त्यांचे संमेलनाचे आयोजन ही केले जाईल. गेल्या दहा वर्षात सभेने शिष्यवृत्ती फंड सुमारे तीन कोटींवर अधिक नेला असून सर्वच गरीब विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. वसतिगृहांचे विकास, वधु-वर मेळावा, शेतकरी, नोकरदार, उद्योजक यांचा विवाह मेळावा घेवून यशस्वी केले आहे. शंभरावे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी या अगोदरही बैठकी झाले असून या बैठकीमध्ये विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे. सर्वांचे मते जाणून घेऊन यशस्वीरित्या अधिवेशन पार पाडण्यात येईल. हा अधिवेशन ऐतिहासिक होणार असून कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार आहे. त्याचबरोबर विविध दिग्गज नेते समाजातील मान्यवर, साहित्यिक, प्रबोधनकार, समाजसेवक यांचाही समावेश असणार आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करून हे अधिवेशन यशस्वीरित्या पार पाडावे, असे आवाहन अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केले. नियोजन बैठकीस अध्यक्ष रावसाहेब पाटील, मुख्य महामंत्री डॉ. अजित पाटील, उपाध्यक्ष दत्ता डोरले, खजिनदार संजय शेटे, सहखजिनदार पापा पाटील, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, यांच्यासह पुष्पक हनुमन्नवर, स्वरूपा पाटील-यड्रावकर, विनयश्री पाटील यांच्यासह सभेचे पदाधिकारी, श्रावक, श्राविका उपस्थित होते.