निपाणी (वार्ता) : हिरेकुडी येथील आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज यांची हिरेकुडी येथे झालेल्या निर्घृण हत्याच्या निषेध करण्यासाठी बुधवारी (ता.१२) सकाळी १० वाजता निपाणी येथे मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
गांधी चौकात आयोजित मोर्चाच्या वेळी कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन महाराज येथील श्री विरूपाक्षलिंग समाधी मठचे विश्व हिंदू परिषदचे जिल्हा अध्यक्ष प्राणलिंग स्वामी, शेंडूर येथील ॐशक्ती मठातील अरुणानंद तीर्थ स्वामी, तमनाकवाडा येथील श्री दत्तपीठाचे सद्गुरु सच्चिदानंद बाबा, प्रभूलिंग स्वामींच्या मार्गदर्शनखाली हा मुकमोर्चा काढण्यात येणार आहे.
गांधी चौक, कोठीवाले कॉर्नर, कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल, जुना पीबी रोड श नगरपलिका कार्यालय मार्गे तहसीलदार कार्यालयात पोहचणार आहे. तेथे तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी हिंदू बांधव आणि भाविकांनी सकाळी दहा वाजता गांधी चौक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta