राजकीय रणधुमाळी सुरू; अनेक ग्रामपंचायत सदस्य सहलीवर
निपाणी (वार्ता) : अडीच वर्षे कालावधी संपल्याने ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी महिन्यापूर्वी आरक्षण आले होते. तेव्हापासून अनेक सदस्य या पदासाठी इच्छुक असल्याने नेतेमंडळीसह स्थानिक मंडळींकडे मनधरणी सुरू केली होती. आता प्रशासनाच्या आदेशानुसार मंगळवार (ता.१८) ते गुरुवार (ता.२७) अखेर निपाणी तालुक्यातील ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर गावागावात राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. तर अनेक ग्रामपंचायत सदस्य चार दिवसापूर्वीच सहलीवर गेले आहेत.
ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची मुदत संपल्यानंतर या पदासाठी महिन्यापूर्वी आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. आपल्याच गटाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष व्हावा, यासाठी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर काही ग्रामपंचायतमध्ये सदस्य संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे कुन्नूर ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मध्ये समसमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यामुळे या ठिकाणी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीमध्ये चुरस होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्या उमेदवारांची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
——————————————————————-
*मंगळवार (ता.१८) अकोळ, कारदगा, आप्पाचीवाडी, संकेश्वर ढोणेवाडी
*बुधवार (ता.१९) कोडणी, जत्राट, शिरदवाड, मांगुर, आडी.
*गुरुवार (ता.२०) भोज, कुन्नूर, शिरगुप्पी, हुन्नरगी
*शुक्रवार (ता.२१) शेंडूर, सिदनाळ, ममदापूर, मानकापूर, बारवाड, बेनाडी.
*शनिवार (ता.२२) कुर्ली, गळतगा, लखनापूर, यरनाळ.
*सोमवार (ता.२४) बेडकीहाळ, यमगर्णी
*बुधवार (ता.२६) कोगनोळी
*गुरुवार (ता.२७)*सौंदलगा
—-
Belgaum Varta Belgaum Varta