उपाध्यक्षपदी सिकंदर अफराज; दोन्ही निवडी बिनविरोध
निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील श्री. अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली.संघाचे अध्यक्षपदी शिवाजी तोडकर व उपाध्यक्षपदी सिकंदर अफराज यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी गजानन लोकरे यांनी केली. संघाचे विद्यमान संचालक युवानेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडी करण्यात आल्या.
यावेळी संघाच्या संचालकपदी उत्तम पाटील, शीतल हवले, रमेश माळी, रावसाहेब पाटील, खानबा चव्हाण, बाळासाहेब मडिवाळ, मायगोंडा पाटील, भारती वसवाडे, वैशाली बुलबुले व जयपाल कोरवी यांची निवड करण्यात आली.
उत्तम पाटील म्हणाले, शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसायकडे पाहिले जाते. या व्यवसायाला चालना देण्यासाठी सहकार रत्न रावसाहेब पाटील यांनी या संस्थेची स्थापना केली. दूध उत्पादक व सभासदांना विविध योजना देऊन त्यांना म्हैस खरेदीसाठी कमी व्याजदरात कर्ज देणे, ऍडव्हान्स बिल देणे, विमा सुविधा, जनावरांचे आरोग्य शिबिरे, सबसिडीवर म्हैस खरेदीसाठी कर्ज अशी विविध योजना हाती घेण्यात येत आहेत. जनावरांना लांपीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मोफत लसही देण्यात आले आहे.
याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालकांचा संघा तर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कृषी संघाचे सी.ई.ओ. आर. टी. चौगुला, व्यवस्थापक बाहुबली कवटे, अजित सावळवाडे, अनिल बुलबुले यांच्यासह संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta