Sunday , December 14 2025
Breaking News

लग्नसराईच्या हंगामामुळे फुलांच्या मागणीत वाढ

Spread the love

फुलांना आले सुगीचे दिवस : बाजारपेठेत फुलांची आवक वाढली
निपाणी : गत वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक लग्नाचा बार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उरकावा लागला. अनेकांनी धुमधडाक्यात लग्न लावण्याचा बेत ठेऊन लग्न पुढे ढकलले. गत वर्षीपासून थांबलेल्या या वधुवरांच्या लग्नाचा बार उडण्यास सुरुवात झाली असून लग्नसोहळ्या प्रसंगी फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी जिल्ह्याबाहेरुन फुलांची आवक निपाणी बाजारपेठेत वाढली असून फुलशेतीला सुगीचे दिवस आले आहे.
तुळशी लग्नानंतर लग्नसराईला सुरुवात झाली असून या निमित्त शहर रंगीबेरंगी आणि विविध प्रकारच्या फुलांनी बहरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यंदा दसरा, दिवाळीसारख्या सणांतही फुलांना अल्प भाव मिळाल्याने शेतकरीसह व्यापारी चिंतेत होता.
मात्र लग्नसराईच्या निमीत्ताने वाढलेली फुलांची मागणी आणि फुलांचे वाढलेले भाव शंभरी पार केल्याने समाधान व्यक्त करत आहे. गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे फुलांचा दर्जा खालावला. त्यामुळे बाहेरुन येणार्‍या फुलांच्या मागणीवर परिणाम दिसून येत असून स्थानिक शेतकरी, व्यापार्‍यांच्या फुलांना चांगला दर मिळत आहे.

असे आहेत फुलांचे दर
सणातही भाव न मिळालेला झेंडू लग्नसराईत मात्र शंभरीपार पोहोचला आहे. पिवळा झेंडू 100 रुपये प्रतिकिलो तर भगवा 60 रुपये, शेवंती 400 रुपये, निशिगंध 120 रुपये दराने विकला जात आहे. गुलाब बंडल 250, ऑर्केट 700, जरबेरा 120 रुपये बंडलप्रमाणे विक्री होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘रयत’ ची विधानसभेला धडक निपाणीत चाबूक मोर्चा; तहसीलदारांना निवेदन

Spread the love  निपाणी (वार्ता) : ऊस पिकापासून सरकारला जाणाऱ्या करातून प्रति टन उसाला किमान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *