उपाध्यक्षपदी शारदा कोळी : उत्तम पाटील गटाचे वर्चस्व कायम
निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदी युवराज उर्फ विराज पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शारदा शरद कोळी यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून जी.डी. मंकाळे यांनी काम पाहिले. मंगळवारी (ता. १८) दुपारी या निवडी झाल्या. निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम पाटील यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष करण्यासह मिरवणूक काढली.
अक्कोळ येथील ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम पाटील यांची सत्ता असून येथे २३ सदस्य कार्यरत आहेत. यावेळी झालेल्या निवडी वेळी अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे युवराज पाटील आणि काँग्रेसतर्फे सुधाकर चव्हाण दोघेजण निवडणूक रिंगणात होते. त्यावेळी युवराज पाटील यांना यांना १६ तर सुधाकर चव्हाण यांना ७ मते मिळाली. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी युवराज पाटील यांची आदेश पदी निवड झाल्याचे घोषित केले. तर शारदा कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर इंद्रजीत सोळांकुरे, डॉ. धीरज पाटील, नूतन अध्यक्ष युवराज पाटील, उपाध्यक्षा शारदा कोळी, हाल शुगरच्या माजी उपाध्यक्षा अनिता पाटील, स्नेहल स्वामी, धनश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी गाव कामगार पाटील राजू पाटील, मीनाक्षी रावसाहेब पाटील-बोरगाव, विवेकानंद सोळांकुरे, सुहास पठाडे, बाबासाहेब आस्वले, चेतन स्वामी, पोपट सिदनाळे, बाबा पाटील, निशिकांत कुरळुप्पे, संतोष मोहिते, किशोर सुतार, विनायक खुबी, समीर मगदूम, संजू हेरवाडे, शाम कागे, डॉ. धीरज पाटील, निरंजन पाटील -सरकार, गजानन कावडकर, शिरीष कमते, इम्रान मकानदार, दिलीप पठाडे, राहुल गोडसे, कौतुक उपाध्ये, जितेंद्र कमते, रितेश पाटील, बाळू व्हनशट्टी, रंगा नांदेकर, अनिल मलाबादे, दादू मगदूम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta