Monday , December 8 2025
Breaking News

विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे

Spread the love

 

प्रा. हसीना कोच्चरगी; निपाणीत गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार

निपाणी (वार्ता) : कुटुंबातील प्रत्येकांचा एकमेकांवरील विश्वास महत्त्वाचा आहे. त्यावरच त्या कुटुंबाची प्रगती होत असते. विद्यार्थ्यांनी ध्येय ठेवून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यास केल्यास यश दूर राहत नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगातील सुप्त गुणांना वाव देऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे. त्यासाठी पालक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन असणे आवश्यक आहे, असे मत कागल येथील डी. आर. माने महाविद्यालयाच्या प्रा. हसीना कोच्चरगी- मालदार यांनी व्यक्त केले.
येथील साखरवाडी स्पोर्टस् क्लब आणि दिग्वीजय युथ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने साखरवाडी मधील सिध्दीविनायक सांस्कृतिक भवनात गायत्रीदेवी एम. वैष्णव यांचे स्मरणार्थ दहावी परीक्षेतील गुणी विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून प्रा.कोच्चरगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शारदा इंगवले होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून उद्योजिका कल्पना साळवे, कांतादेवी वैष्णव, अनिता सावंत कुसुम जासूद सुनिता शिंदे आयेशा पटेल उपस्थित होत्या.
प्रारंभी जिजाबाई राऊत यांनी स्वागत केले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन झाले. यावेळी दहावी वार्षिक परीक्षेत यश मिळवलेल्या विविध शाळातील विद्यार्थ्यांसह अंकुर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या चेतना अमर चौगुले, सेक्रेटरी
अमर राजाराम चौगुले, विजया अशोक मोहिते, अशोक रामचंद्र मोहिते यांचाही विशेष कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास उस्मानगणी पटेल, माजी सभापती संदीप कामत, निरंजन कमते, बाबुराव भोपळे, भवरलाल वैष्णव, रमेश वैष्णव, रामेश्वर वैष्णव, हर्षद जाधव, ऋतू जाधव, चंद्रकांत कदम, बाळासाहेब कळसकर, रोहन राऊत, उत्तम लोहार, अनिल संत, नवीन लोहार, उत्तम सांगावकर, आप्पासाहेब खोत यांच्यासह साखरवाडी स्पोर्ट्स क्लब आणि दिग्विजय युथ क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सागर सांडगे, नयना उळेगड्डी यांनी सूत्रसंचालन केले. कार्तिक राऊत यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

Spread the love  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *