कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 जवळ असणाऱ्या दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. निपाणी व कागल तालुक्यात पाऊस थोडा कमी असला तरी कोकण पट्ट्यात पावसाचा जोर असल्याच्या कारणाने दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
आणखी दोन चार दिवस पावसाचा जोर जर असाच राहिला तर दूधगंगा नदीचे पाणी शेजारी असलेल्या गांवामध्ये जाण्याची भिती निर्माण झाली आहे. निपाणी पोलिस व ग्राम पंचायत यांच्या वतीने नदीकाठी असणाऱ्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या परिसरामध्ये सुरू असणारा पाऊस सुरुवातीला पेरणी करण्यात आलेल्या सोयाबीन व भुईमूग पिकास पोषक ठरत आहे. सध्या परिसरामध्ये सोयाबीन व भुईमूग पिके बहारदार आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta