एस. बी. पाटील; कुर्ली हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : प्रत्येकाला आपण यशस्वी व्हावे, असे वाटत असते. मात्र त्यासाठी ध्येय निश्चितीची नितांत आवश्यकता असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये निश्चितच काही कलागुण किंवा शक्तिस्थाने असतात. मात्र प्रत्येकाला त्याची जाणीव नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनीआत्मपरीक्षण करावे. स्वतः ची शक्तिस्थाने ओळखून त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. विद्यार्थी दशेत ध्येय ठरवणे सोपे आहे. पण ते साध्य करण्यासाठी कणखर मानसिक हवी, असे मत खडकलाट हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एस. बी. पाटील यांनी व्यक्त केले. कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात मिनि गुरुकुल उपक्रमाअंतर्गत आयोजित व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. एस. पाटील होते.
एस. एस. चौगुले यांनी स्वागत केले. बी. एस. पाटील यांच्या हस्ते एस. बी. पाटील यांचा गौरव करण्यात आला.
पाटील यांनी अभ्यासक्रम रचना व अभ्यास नियोजन याबाबत सोदाहरण मार्गदर्शन केले.
याप्रसंगी टी. एम. यादव, एस. ए.पाटील, एस. एस. साळवी, के. ए. नाईक, यु. पी. पाटील, एस. के. कोष्टी, विजय साळुंखे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. ए. ए. चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. तर डी. डी. हाळवणकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta