निपाणी (वार्ता) : अक्कोळ प्राथमिक रूग्णालयातील एफडीए कर्मचारी शब्बीर देसाई हे २५ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. येथील हॉटेल संगम पॅराडाईज येथे आयोजीत कार्यक्रमात तालुका आरोग्याधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. विठ्ठल शिंदे यांनी शब्बीर देसाई यांनी गेल्या २५ वर्षांत बेळगाव जिल्हा आरोग्य केंद्र, निपाणी महात्मा गांधी ईस्पितळ, अकोळ प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी प्रामाणिकपणे सेवा बजाविली आहे. त्यांनी सेवा काळात केलेल्या कार्याचे कौतुक करून आगामी काळातही त्यांनी समाजसेवेत सक्रिय रहावे, असे आवाहन केले. यावेळी अप्पर जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. गडेद, कार्यालयीन अधीक्षक नविन गंगरेड्डी, अकोळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी श्रीमती डॉ. शितल कुलकर्णी, बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. सलीम मुजावर, यांच्यासह अपवपर जिल्हा आरोग्याधिकारी कार्यालय, चिकोडी आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालय, अकोळ प्राथमिक आरोग्य केंद्र, निपाणी आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, मान्यवरांनी देसाई यांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta