अल्लमप्रभु स्वामी; गौरी गणेश संस्थेच्या शाखेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : जिल्ह्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातू अनेक संघ संस्था काम करीत शेतकरी सभासदांचा विकास साधला. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी सहकार क्षेत्र हे एक माध्यम बनले आहे. सहकार क्षेत्रामुळेच ग्रामीण विकास होत असल्याचे मत चिंचणी येथील श्री. अल्लमप्रभू स्वामींनी यांनी व्यक्त केले.
बोरगावच्या श्री. गौरी गणेश महिला सहकार संघाच्या शिरगाववाडी येथे शाखेचे उद्घाटन अल्लमप्रभु स्वामी यांच्या हस्ते, बोरगाव पिके पी एस चे अध्यक्ष उत्तम पाटील व संस्थापक अध्यक्ष अभयकुमार मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी स्वामी बोलत होते.
ठेवीदारापेक्षा कर्जदार हा संस्थेचा आर्थिक कणा बनलेला आहे. कर्जदार हा संस्थेत व्याज भरत असतो. त्यामुळे संस्थेची प्रगती होत असते. त्यामुळे संस्था चालकांनी ठेवीदारापेक्षा कर्जरांना मोठे मानले पाहिजे .सहकार क्षेत्रातील जाळे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. संस्था चालकांनी प्रामाणिक व चोख व्यवहार करीत सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून संस्था चालवावी, असे आवाहन स्वामींनी केले.
संस्थेच्या अध्यक्षा अश्विनी अभयकुमार मगदूम यांनी, परिसरातील महिलांना एक व्यासपीठ निर्माण व्हावे व त्यांचा आर्थिक प्रगतीत हातभार लावावा या उद्देशाने २०१८ साली गौरी गणेश महिला संघाची स्थापना केली. महिला सबलीकरण व महिलांना ऊर्जा देण्याबरोबरच महिलांसाठी संघाच्या वतीने संगणक ज्ञान शिबिर, व्यापार उद्योग उभारण्यासाठी आर्थिक सहाय, मार्गदर्शनही करण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी सुदर्शन खोत, आनंद गिंडे, सुरेश खोत, सोमेश पाटील, अरुण बोने ,शिरगाव वाडी ग्रामपंचायत अध्यक्ष जयगोना तहसीलदार, उपाध्यक्ष बाबुराव लाटकर, किरण पाटील, बसव बाबनावर, राजू हर्गापुरे, अनिल श्याम, बाहुबली मगदूम, सतीश फराळे, अशोक हारगापूरे ,आनंद जाधव, भीमसेन उचगावे, बाबू तोडकर, संदीप हराळे, भीवां उचगट्टी, यांच्यासह जय गणेश मल्टीपर्पज सोसायटीचे संचालक, गौरी गणेश महिला संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. चांदबी मुजावर यांनी स्वागत,जयगणेश मल्टिपर्पज सोसायटी चे कर्यानिर्वाहक संतोष हंचनाळे यांनी प्रास्ताविक तर शाखा व्यवस्थापिका निकीता व्हणशेट्टी यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta