कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या दूधगंगा नदीवरील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींची चोरी झाल्याची घटना शुक्रवार ता. 25 रोजी उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटरी दूधगंगा नदी काठावर बसवण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री अज्ञात चोट्यांच्या कडून 20 एचपी च्या दोन मोटारींची चोरी करण्यात आली. तर शुक्रवार ता. 25 रोजी 5 एचपी मोटर व जवळच असणाऱ्या टीसीची मोडतोड करून त्यातील तेल पळवून नेण्याची घटना घडली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून दूधगंगा नदीवरील असणाऱ्या पुलानजीक विद्युत मोटरी चोरून नेण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
मधुकर शिंदे यांच्या वीस एचपी च्या दोन विद्युत मोटरी तर शुक्रवारी रात्री बाबुराव चिंचणे यांची पाच एचपीची विद्युत मोटर, शेजारीच असणाऱ्या विठ्ठल पाटील दहा एचपीची विद्युत मोटर, पत्रावळे यांच्या विद्युत मोटरला विद्युत पुरवठा करणाऱ्या टीसीची मोडतोड करून त्यातील तेल पळून नेले आहे.
यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये विद्युत मोटरी चोरून नेण्याची घटना वारंवार घडत असल्याने पोलीस यंत्रणेने त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta