श्रीकृष्ण जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : श्रीकृष्ण जयंती उत्सव एक दिवसांवर आणि गोपाळकाला दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने गोपाळकाला सणासह मंडळ व गोविंदा पथके दहीहंडीसाठी सज्ज झाली आहेत. दहीहंडी उत्सवाची अधिक रंगत आणण्यासाठी निपाणी व परिसरातील विविध मंडळाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. जन्माष्टमी बुधवारी (ता. ६) झाल्यावर दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याला विविध मंडळांकडून दहीहंडी फोडली जाते.
शहरातील काही मंडळांकडून तिसऱ्या, चौथ्या दिवशी दहीहंडी फोडण्याचे नियोजन केले आहे. मानवी मनोन्यातून फोडलेल्या दहीहंडीतून गोविंदा पथके बक्षिसांची लयलूट करणार आहेत. गणेशोत्सवासह पदाधिकाऱ्यांची गोपाळकाल्याचीही तयारी सुरू असून निपाणी व परिसरात जवळपास १३ मंडळांकडून दहीहंडीचा उत्सव केला जाणार आहे. येथील चाटे मार्केट व्यापारी दहीहंडी मित्र मंडळतर्फे यावर्षी अखंडीतपणे ३७ व्या वर्षे दहीहंडी कार्यक्रमाचे ऊ केले आहे. त्यासाठी बोरगाव येथील पीकेपीएसचे अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांनी १ लाख १ रुपयाचे बक्षीस ठेवले आहे. श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार, श्रीमंत नगरसेवक बाळासाहेब देसाई -सरकार, सामाजिक कार्यकर्ते रत्नशास्त्री ए.एच. मोतीवाला, नगरसेवक विलास गाडीवड्डर, नगरसेवक विनायक वडे यांच्या नेतृत्वाखाली ही दहीहंडी होणार आहे.
शहरातील गोविंदा पथकांनी दहीहंडीचा सराव पूर्ण केला आहे. जवळपास आठ मानवी मनोरे उभे करून दहीहंडी फोडण्याचा मानस मंडळांनी व्यक्त केला आहे. त्यामध्ये गडहिंग्लज येथील नेताजी पालकर गोविंदा पथकाचा समावेश आहे.
Belgaum Varta Belgaum Varta