Wednesday , March 4 2026
Breaking News

डॉ. राधाकृष्ण यांचा आदर्श घेऊन काम करावे

Spread the love

 

आमदार शशिकला जोल्ले; निपाणीत शिक्षक दिन
निपाणी (वार्ता) : आपल्या कारकिर्दीमध्ये शिक्षणाला महत्त्व देऊन निपाणी भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केल्याने शिक्षकांना समाजात महत्त्वाचे स्थान आहे. त्यांनी सर्वपल्ली डॉ. राधाकृष्ण यांचा आदर्श घेऊन काम करावे. शिक्षकांमध्ये देशाचे भविष्य निर्माण करण्याची ताकद आहे, असे मत आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. बेळगाव जिल्हा, तालुकापंचायत, शिक्षण विभाग, निपाणी गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात मंगळवारी (ता.५) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आणि शिक्षक दिन कार्यक्रम झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून आमदार जोल्ले बोलत होत्या.
आमदार जोल्ले म्हणाल्या, कोरोना सारख्या काळातही शिक्षकांनी उत्कृष्टपणे काम केले आहे. त्यामुळेच या विभागाचा शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे. शिक्षकांनी वेळेचे व्यवस्थापन कामाचे महत्त्व समजून घेऊन सकारात्मक दृष्टीने ज्ञानदानाचे काम करावे. येत्या चार वर्षात शिक्षणासाठी विविध कामे हाती घेणार असून त्यासाठी शिक्षकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
प्रारंभी प्रणालींग स्वामी व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन झाले. गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी, देशाच्या बांधणीमध्ये शिक्षकांचे योगदान मोठे आहे. त्यांच्यामुळेच अनेक जण विविध पदावर कार्यरत असून गुरूंचे निरंतर स्मरण करण्याचे आवाहन केले.
यावेळी तालुका आणि जिल्हा पातळीवर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवलेल्या शिक्षकासह सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास तहसीलदार मुजफ्फर बळीगार, नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी, माजी नराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्या निता बागडे, सभापती राजु गुंदेशा, प्रणव मानवी, अभय मानवी, क्षेत्र समन्वय अधिकारी आर. ए. कागे, प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे अध्यक्ष सदाशिव वडर, उपाध्यक्ष पी. पी कांबळे
भास्कर स्वामी, सुनील शेवाळे, एम. वाय. गोकार, रावसाहेब जनवाडे, प्रा. सुरेश कांबळे, बाबुराव मलाबादे, बी. एच. लंगोटी, शिल्पा भुसाणी, पी. एस. पाटील, अरविंद कांबळे, वाय. बी. हंडी यांच्यासह नगरसेवक विविध शिक्षक संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित बी. एस. मगदूम, जी. बी. गलबी यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

लेटेक्स कॉलनीत मूलभूत सुविधा न दिल्यास नगरपालिके समोर नागरिकांचा उपोषणाचा इशारा

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शहरा बाहेर असलेल्या लेटेक्स कॉलनीमध्ये बऱ्याच वर्षापासून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *