Friday , March 6 2026
Breaking News

निपाणीत शुक्रवारी मोफत तपासणी मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेळगाव के. एल. ई. संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमान शुक्रवारी (ता.८) सकाळी १० वाजल्यापासुन दुपारी १ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी, मोफत कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन तपासणी शिबिर येथील अंदोलन नगरमधील डॉ. एम. जे. कशाळीकर रोटरी कम्युनिटी हॉल, रोटरी ब्लड बँक येथे होणार आहे.
मोफत नेत्र तपासणी, कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन तपासणी संबंधी आजारावर मोफत तपासणी व सल्ला देण्यात येणार आहे. तरी गरजुनी या संधिचा लाभ घ्यावा, असे आवाहन के. एल. ई. संस्थेचे संचालक अमर बागेवाडी यांनी केले आहे. यावेळी रोटरी क्लब निपाणीचे अध्यक्ष प्रवीण तारळे, सचिव राजेश तिळवे, खजिनदार श्रीमंधर होनवाडे, के. एस. ई. एस. रोटरी हेल्थ केअर सेंटरचे अध्यक्ष दिलीप पठाडे व रोटरी सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव के. एस. पाटील हायस्कूलमध्ये दहावी विद्याथ्यर्थ्यांचा सदिच्छा समारंभ

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील बोरगाव शिक्षण संघाच्या के. एस. पाटील माध्यमिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *