निपाणी (वार्ता) : तब्बल ३७ व्या वर्षात पदार्पण केलेल्या चाटे मार्केट व्यापारी दहिहंडी मित्र मंडळच्या वतीने शनिवारी (ता.९) सायंकाळी ६ वाजता मानाची दहीहंडी फोडली जाणार आहे. विजेत्या गोविंदा पथकास एक लाखांचे बक्षीस व शिल्ड दिली जाणार असल्याचे चाटे मार्केट व्यापारी दहीहंडी मित्र मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दहीहंडी कार्यक्रमाचे औचित्य साधून होत असलेल्या या कार्यक्रमास निपाणीतील श्रीसंत बाबा महाराज चव्हाण तालीम मंडळ, दर्गा गल्ली व नवभारत व्यायाम मंडळ, घट्टे गल्ली या दहिहंडी पथकास चाटे मार्केट व्यापारी मित्र मंडळा मार्फत सलामीसाठी पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय गडहिंग्लज येथील नेताजी पालकर व्यायाम शाळेच्या गोविंदा फटकाला विशेष आमंत्रित केले आहे. बोरगाव येथील पिकेपीएसचे अध्यक्ष उद्योजक उत्तम पाटील यांच्याकडून विजेत्या गोविंदा पथकास एक लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. यावेळी आकर्षक विद्युत रोषणाईसह ढोल ताशा पथकाचा कार्यक्रम होणार आहे.
माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवड्डर, माजी सभापती व विद्यमान नगरसेवक सुरेख उर्फ बाळासाहेब देसाई सरकार, श्रीमंत दादाराजे निपाणकर सरकार, सामाजिक कार्यकर्ते ए. एच. मोतीवाले, नगरसेवक विनायक वडे, सामाजिक कार्यकर्ते, सुनील शेलार यांच्या कडून दहिहंडी कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले आहे. यावेळी शहर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुजित देसाई -सरकार, उपाध्यक्ष अतुल शिंदे, खजिनदार अल्ताफ रहाजुखान यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta