
उत्तम पाटील; अरिहंत क्रेडिट मल्टीस्टेटची वार्षिक सभा
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत संस्थेला मल्टीस्टेटचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात संस्थेचा विस्तार होणार आहे. त्याच्या माध्यमातून सर्वांचे जीवनमान उंचावणार आहे. यंदा सर्वांच्या सहकार्याने संस्थेला आर्थिक वर्षात 9 कोटी 72 लाखावर नफा झाल्याची माहिती बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिली.
बोरगाव येथील अरिहंत सभागृहात आयोजित संस्थेची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर सहकारात्मक रावसाहेब पाटील यांच्यासह संचालक व मान्यवर उपस्थित होते.
उत्तम पाटील म्हणाले, राज्यात श्री अरिहंत संस्थेने सर्वसामान्य सभासद व शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध ठिकाणी शाखा विस्तारित करून त्यांच्या आर्थिक संकटात नेहमीच मदत केली आहे. अहवाल सालात संस्थेत एकूण 13870 सभासद, 5 कोटी 51 लाखावर भांडवल, 67 कोटी 63 लाखावर निधी, 1104 कोटी ठेव आहे. संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी 16 कोटी 96 लाखांवर गुंतवणूक केली आहे. 938 कोटी 48 लाखांवर कर्ज वितरण केले असून संस्थेस अहवाल सालात 9 कोटी 72 लाखांवर निव्वळ नफा झाला आहे. यावर्षी 156 विद्यार्थ्यांना 5 लाख 80 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली आहे.
प्रधान व्यवस्थापक अशोक बंकापूरे यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन केले.
याप्रसंगी रावसाहेब पाटील यांनी उत्कृष्ट शाखा म्हणून संकेश्वर तर उत्तम व्यवस्थापक म्हणून बसवान कुडची शाखेचे वसंत कुलकर्णी, उत्तम सेवक म्हणून अजित पाटील यांची घोषणा केली. त्याचा संस्थेमार्फत प्रमाणपत्र व शिल्ड व रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
उत्तम पाटील म्हणाले, सध्या सहकारी संस्था चालविणे कठीण असताना अरिहंत संस्थेने योग्य नियोजन, कर्तव्यदक्ष जबाबदारी पार केल्याने संस्था आर्थिक प्रगती साधत आहे. संस्थेच्या सहकार्याने बेळगाव येथील सुसज्ज हॉस्पिटल, साखर कारखान्यांना सहकार्य, सभासदांन बरोबर सभासदांच्या मुलांनाही संस्थेचा लाभ मिळावा यासाठी नवनवीन शैक्षणिक योजना हाती घेतल्या असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष सुभाष शेट्टी यांनी अहवाल वाचन केले.
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, अशोककुमार आसोदे यांनी मनोगत व्यक्त केले.
युवा उद्योजक अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील, संचालक जयगोंडा पाटील, अक्षयकुमार करोले, जयपाल नागावे, आप्पासाहेब कडोले, पिरगोंडा पाटील, भुजगोंडा पाटील, शरदकुमार लडगे, सतीश पाटील, बाबासाहेब आपराज,श्रीकांत वसवाडे, निर्मला बल्लोळे, अजित कांबळे यांच्यासह मुख्य व्यवस्थापक ए. जे. बंकापुरे, एस. के. तेरदाळे, राजू पाटील- अकोळ, अरुण निकाडे, महेश पाटील, के. डी. पाटील, दिलीप पठाडे, शिरीष कमते, प्रकाश गायकवाड, निरंजन पाटील, इंद्रजीत पाटील, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, आनंदगिंडे, पिरगोंडा पाटील, किशोर बाली, राजेंद्र कंगळे, आर. टी. चौगुले, प्रकाश जंगटे यांच्यासह सर्व शाखांचे पदाधिकारी व सभासद कर्मचारी उपस्थित होते. आर. एस. पचंडी यांनी सूत्रसंचालन केले. सतीश पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta