निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील एचजेसी चिफ फौंडेशनच्या वतीने गणेशोत्सव निमित्त झिम्मा-फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन उदघाटन कागल तालुका शिवसेना महिला आघाडी प्रमुख रुपाली पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कमल चौगुले या होत्या. स्पर्धेमध्ये सोनाळी येथील नागनाथ महिला मंचने प्रथम क्रमांक पटकावला.
एस. एस. चौगुले यांनी, प्रस्ताविकात स्पर्धा आयोजनबाबत माहिती दिली.
रुपाली पाटील यांनी, भारतीय संस्कृती ही श्रेष्ठ असून सण-उत्सवाव्दारे प्रबोधन व मनोरंजन केले जाते. पारंपारिक रूढी परंपरा व सण साजरे करण्याची पद्धत काळानुसार बदलत असून प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत सण उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीमुळे संस्कृती संवर्धन होत असल्याचे सांगितले.
स्पर्धेत कन्या ग्रुप- हदनाळ, सद्गुरू राजगिरी महिला मंच -कुर्ली, निलगंगा महिला मंच कुर्ली यांनी बक्षीस मिळविली. एस. ए. पाटील, यु. पी.पाटील, ए. एम. अमृतसमन्नावर, यांनी परीक्षण केले.
यावळी बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संघांनी पारंपारिक सुप नाचवणे, घागर घुमवणे, फुगडी, काटवटकणा, उखाणा, पायातला घोडा, एकेरी घोडा, पिंगा, चुईफुई आदी प्रकार उस्फुर्तपणे सादर केले. पारंपारिक कला सादर करीत पर्यावरण संवर्धन, लेक वाचवा, शेती व खते वापर, पाणी व ऊर्जा बचत यावर जनजागृती प्रबोधन केले. या स्पर्धेत लहान मुली पासून वृद्ध महिलांनी आपली कला सादर केली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्योती चौगुले, मेघा चौगुले, नीलम चौगुले, नीतू चौगुले, वैष्णवी चौगुले, आरती नाईक, ऋतुजा चौगुले, आकांक्षा रेडेकर, सिम्रन नाईक यांनी परिश्रम घेतले.
यावेळी सुनीता चौगुले, अनिता चौगुले, रेखा चौगुले, सुवर्णा चौगुले, मनीषा चौगुले, लता चौगुले, शिल्पा चौगुले, शोभा चौगुले, पल्लवी चौगुले, यशोदा चौगुले यांच्यासह महिला उपस्थित होत्या.