
आमदार शशिकला जोल्ले; बोरगावमध्ये १०८ रथोत्सव कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : ‘जगा आणि जगू द्या’असा संदेश जैन धर्माने दिला आहे. त्यामुळे जैन धर्म पवित्र असून अहिंसा मार्गाने जीवन जगण्याचा सल्ला त्यागी मुनींनी दिला आहे. श्री क्षेत्र सम्मेद शिखरजी येथे कर्नाटक भवनासाठी मंत्री असताना प्रयत्न केले आहेत. लवकरच मुख्यमंत्री व संबंधित खात्याच्या मंत्र्यांना भेट देऊन सम्मेद शिखरजी येथे भवन निर्माण करण्यासाठी प्रयत्न आहे, असे मत आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले.
बोरगाव येथे मुनीश्री १०८ कुलरत्न भूषण महाराज यांच्या पावन वर्षायोग निमित्त आयोजित दशलक्षण पर्वा निमित्त १०८ रथोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार गणेश हुक्केरी, माजी खासदार राजू शेट्टी, माजीमंत्री वीरकुमार पाटील,माजी आमदार काकासाहेब पाटील, हालसिद्धनाथ कारखान्याचे अध्यक्ष एम.पी.पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हावले उपस्थित होते.
आचार्य श्री १०८ कुलरत्नभूषण महाराजांनी, जैन धर्मातील मुनी त्यागींचे तत्वे, आदर्श जगाच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहेत. २४ तीर्थकारांनी जन्म घेतलेला हा देश विश्वाला आदर्श आहे. सत्य, न्याय, अहिंसा, त्याग, संयम अशा पाच रत्नत्रयाच्या माध्यमातून जैन मुनिनी संपूर्ण जगाला जगा आणि जगू द्या हा संदेश दिल्याचे सांगितले.
आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण, महावीर सर्कलवर उभारण्यात येत असलेल्या कीर्ती स्तंभाचे ध्वजारोहण खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते झाले.
आमदार गणेश हुक्केरी यांनी, पुण्याक्षेत्र सम्मेद शिखरजी येथे होणाऱ्या कर्नाटक भवन निर्मितीसाठी आमदार प्रकाश हक्केरी यांच्या नेतत्वाखाली आपण राज्य शासनाकडूननिधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण आणि लँडिंग रॉकेटचे प्रदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास हालशुगरचे संचालक आप्पासाहेब जोल्ले रामगोंडा पाटील, जयकुमार खोत, शरद जंगटे, सावकर मादनाईक, चंद्रकांत भोजे-पाटील, भाऊसाहेब पाटील, भाऊसाहेब बंकापुरे, विद्याधर अम्मन्नावर, राजू खिचडे, रमेश मालगावे, अजित तेरदाळे, अनुज हावले, भरत जंगटे, सुरेंद्र पाटील, सुकुमार चिप्रे, शितल हावले, आणासाहेब बारवाडे, संजय हावले यांच्यासह श्रावक, श्रविका उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta