
धार्मिक विधींना फाटा; नामदेव चौगुले यांचा उपक्रम
निपाणी (वार्ता) : येथील रहिवासी आणि अर्जुनी येथील लाल बहादूर शास्त्री विद्या मंदिर शाळेचे शिक्षक नामदेव चौगुले यांनी आपले वडील विठोबा लक्ष्मण चौगुले यांच्या स्मृती दिनानिमित्त इतर कार्यक्रमांना फाटा देऊन ५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. याशिवाय शाळेला साऊंड सिस्टिम भेट दिली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
शिक्षक नामदेव चौगुले यांनी यापूर्वी स्वखर्चाने शाळा डिजिटल करण्यासह इतर समाज व शैक्षणिक उपयोगी अनेक उपक्रम राबविले आहेत. वडिलांच्या स्मृतिदिना निमित्त धार्मिक विधिना फाटा देत शाळेतील पाच मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्यासह शाळेला साऊंड सिस्टिम भेट दिली आहे. मागील काही वर्षात शाळेतील खेळाडूंना खेळाचे कीट, कोरोना काळात शाळेतील मुलांना चांगल्या दर्जाचे मास्कसह विविध प्रकारची रोपे व पुस्तके देऊन सामाजिक उपक्रम राबविले आहे. सरपंच बापूसाहेब यादव यांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे समाज परिवर्तन शक्य असल्याचे सांगितले.
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. ते आपण फेडले पाहिजे, ही भावना मनात रुजवून हा उपक्रम राबविल्याचे नामदेव चौगुले यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच सुनील देसाई, शिरीष कमते, गिरीश खोत, राजन देसाई, सी. आर. देसाई, संदीप सुतार, वर्षा सुतार, शकुंतला देसाई, महादेव पेडणेकर, साताप्पा चौगुले, संजीवनी चौगुले, रेश्मा कांबळे, मुख्याध्यापक शंकर पाटील, प्रदीप बुधाळे पाटील, संतोष वडेर, अर्चना गोरुले, शबाना मुजावर, महादेवी कांबळे, विजय गावडे, बाजीराव चौगुले, सुदाम देसाई, मोहन चौगुले, विकास कांबळे एकनाथ कांबळे, जयसिंग कांबळे सुनील कांबळे, अनिल उन्हाळे, अनिल निकम उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta