
मॉडर्न इंग्लिश स्कूलचा उपक्रम ; ९० विद्यार्थ्यांचा सहभाग
निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात मुलांना शाळेचा डबा तयार करून देण्यासाठी नोकरदार महिलांना वेळ कमी पडत आहे. त्यामुळे हॉटेल व इतर उपहारगृहातून उपहार त्यांना डबे दिले जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना पाककलेचे धडे देण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात बसून पटांगणात चपाती भाजी तयार वेगळाच उपक्रम राबविला. त्यामध्ये शाळेतीलस्काऊट आणि गाईडच्या ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
निपाणी शहराच्या खवय्या गिरीमध्ये येथील चपाती भाजी कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चपाती भाजी बनवण्याचा निर्धार केला. त्यानुसार घरातून गव्हाचे पीठ, गोडेतेल,भजीसाठी लागणारे हरभरा डाळीचे पीठ, बटाटे, चटणी मीठ व इतर साहित्य आणले होते. चपातीसाठी पीठ मळण्यापासून भाजी तयार होईपर्यंत सर्व कामे विद्यार्थ्यांनी स्व:हाताने केली. तब्बल दीड तासापेक्षा अधिक वेळ यासाठी लागला. या क्रियेतून मुलांनी आत्मनिर्भयांचे प्रात्यक्षिक, धडे घेतले. शाळेमध्ये घेतलेल्या या विशेष क्रियेचे समाजातून कौतुक होत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या चपाती भाजीची पाहणी करून पालकासह शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा मंडळाच्या अध्यक्षा राजश्री नागार्जुन हलगेकर, प्राचार्या स्नेहा घाटगे, स्वाती पाटील, धनश्री लोहार, अर्चना जोरापुरे, सुकुमार गोरवाडे, एस. डी. पवार, शिवानंद कुंभार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta