
निपाणी : निपाणी येथील डॉ.चंद्रकांत कुरबेट्टी यांनी घरासमोर लावलेली कार (क्र. एमएच ०९ डीएक्स १८५५) ही गाडी चोरट्यांनी नेली होती. याबाबत डॉ. कुरबेट्टी यांनी बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. डॉ.कुरबेट्टी यांनी आपल्या बंगल्यासमोर लावलेली कार मंगळवार दि. 10 रोजी सायंकाळी चोरीला गेली होती. डॉ. कुरबेट्टी यांच्या लक्षात येताच शहर परिसरात गाडीचा शोध घेतला. मात्र गाडी सापडली नसल्यामुळे निपाणी पोलीस स्थानकात गाडी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. पोलीस उपनिरीक्षक रमेश पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली होती तर सदर चोरीला गेलेली गाडी त्याचदिवशी निपाणी परिसरात रस्त्याशेजारी उभी असलेली आढळून आली. चोरट्यानी डॉ. कुरबेट्टी यांच्या बंगल्याच्या आवारातून चोरून नेलेली गाडी डिझेल संपल्यामुळे रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे सदर कार रस्त्यातच सोडून चोरटे पळून गेले पोलीस चोरट्यांचा तपास करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta