
निपाणी (वार्ता) : येथील हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब दर्गा प्रस्थापक श्री संत बाबा महाराज चव्हाण मूर्तीची प्रतिष्ठापना चव्हाण वाडा समाधी स्थळ येथे करण्यात आली. त्यानिमित्त होमहवन, पूजापाठ, दिंडी सोहळा, बाहेरील समाधीस आरती, दर्गाभेट करण्यात आली. श्रीमंत विश्वासराव विष्णुपंत देसाई सरकार व श्रीमंत राजाका विश्वासराव देसाई सरकार यांच्या प्रेरणेने कल्पना मोहनराव भुईम्बर यांनी संत बाबा महाराज चव्हाण यांची मूर्ती बसवली. यावेळी संत बाबा महाराज भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला.चव्हाण वाडा येथे महाप्रसादाने सोहळ्याची सांगता करण्यातआली.
कार्यक्रमास नगरसेवक बाळासाहेब देसाई -सरकार,संग्राम देसाई -सरकार, रणजीत देसाई -सरकार, पृथ्वीराज चव्हाण, विवेक मोकाशी, चेतन भुईम्बर, रोहन भुईम्बर, राजूबाबा निपाणकर, प्रभाकर पाटील, जयराम मिरजकर, संजय माने, मिलिंद मेहता, अतिश सुतार, संजय सुतार, महादेव सुतार, अजित भोकरे, बाळासाहेब पोतदार, सुनील अबदागिरे, बाळासाहेब चव्हाण, गजानन खापे, सारिका खापे, दिलीप खराडे, प्रकाश शिंदे, प्रवीण हेगडे, संजय कुरणे, विनय मोकाशी, सुरेश मोकाशी, प्रविता जाधव, संयोगिता चव्हाण, नम्रता देसाई- सरकार, सम्राज्ञी देसाई, सरिता देसाई, नंदादेवी देसाई, कुसुम भाटले, रेश्मा भुइंबर, विद्या मोकाशी यांच्यासह भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta