निपाणी (वार्ता) : बेडकिहाळ येथील ग्राम दैवत श्री कल्याण सिद्धेश्वर देवाच्या ऐतिहासिक दसरा महोस्तवानिमित्य गेल्या १० वर्षा पासून बेडकिहाळ – शमनेवाडी दसरा कब्बडी कमिटीच्या वतीने दिवस रात्र भव्य अंतर राज्य पुरुष व महिला कब्बडी स्पर्धेचे आयोजन करून क्रीडा क्षेत्रात एक इतिहास रचले आहेत. कर्नाटक राज्य अम्यच्युअर असोसिएशन व चिकोडी शैक्षणिक जिल्हा अम्यॅच्यूअर कब्बडी असोसिएशन अंतर्गत तर अरिहंत उद्योग समूह बोरगाव, अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशन सदलगा यांच्या विशेष सहयोगाने येत्या मंगळवार ता २४ व बुधवार ता २५ ऑक्टोबर रोजी भव्य आंतरराज्य पुरुष व महिला कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कमिटीचे सदस्य अनिल गोसावी यांनी दिली.
श्रीमती कुसुमावती मिर्जी महाविध्यालयच्या परिसरात बुधवार (ता. १८) रात्री ८ वाजता कब्बडी कमिटीचे अध्यक्ष सुरेश खोत, उपाध्यक्ष संजय पाटील, संयोजक किरण पांगीरे, दत्त कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत, ज्येष्ठ नेते बाबासाब खोत, तात्यासाहेब खोत, तात्यासाहेब चौगुले, ग्राम पंचायत सदस्य अब्दुल जुनेदी पटेल, सचिन खोत, बोरगाव पीकेपीएसचे व्यवस्थापक विपुल चौगुले, यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत उपस्थितांचे स्वागत सचिन मालगत्ते यांनी केले.
प्रारंभी बेडकिहाळ – शमनेवाडी दसरा कब्बडी कमिटी कार्यालयाचे उदघाटन इंद्रजित पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. तर सिद्धेश्वर व रामलिंगेश्वर फोटो पूजन बाबासाब खोत, अशोक आरगे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी अधिक माहिती देताना अध्यक्ष सुरेश खोत म्हणाले, गेल्या १० वर्षा पासून बेडकिहाळ दसरा महोस्तवा निमीत्य मिर्जी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील, अभिनंदन पाटील व विधान परिषद सदस्य व माजी खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष सहयोगाने भव्य पुरुष व महिला कब्बडीस्पर्धेचे आयोजन करून यशस्वी पद्धतीने पार पडत येत आहे. यावर्षी देखील यांच्या विशेष सहकार्याने २४ व २५ ऑक्टोबर रोजी अरिहंत उद्योग समूहाच्या वतीने पुरुष गटासाठी ५० हजार, ४० हजार, ३० हजार, २० हजार व महिला गटासाठी ४० हजार, ३० हजार, २० हजार व १० हजार अशी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, व चौथा क्रमांकाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. कब्बडी स्पर्धेसाठी सुमारे १० ते १५ हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था, बाहेरून येणाऱ्या स्पर्धकांना राहण्याची व जेवणाची सोय केली आहे.
गुरुवार (ता. २६) रोजी अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातील कलाकारांना त्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून कलाकौशल्य कलाकार २०२३ या संस्कृतीत कार्यक्रम स्पर्धा आयोजिले आहे. या मध्ये गायन, भाषण, जानपद, दांडिया, आदी स्पर्धा घेतली जाणार आहे. सकाळी ९ वाजता स्पर्धकांची निवड करून सायंकाळी ५ वाजता निवडक स्पर्धकांचे स्पर्धा सुरु केली जाणार आहे. यास्पर्धेत गायन, भाषण, जानपद नृत्य, दांडिया व कोमिडी – मिमिग्री स्पर्धेसाठी प्रत्येकी ५०००, ३०००, २०००, अशी अनुक्रमे बक्षीस जाहीर करण्यात आले असल्याचे शेवटी खोत यांनी सांगितले. या प्रसंगी इंद्रजित पाटील, सुनील नारे, आदींनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी माजी ग्रा. पं. अध्यक्ष शंकर पाटील, किशोर इनामदार, मलगोंडा पाटील, कुमार बेडगे, बाबासाब तेली, प्रशांत पतील, महावीर पाटील, यांच्यासह बेडकिहाळ- शमनेवाडी दसरा कब्बडी कमिटीचे सर्व सदस्य, पदाधिकारी, खेळाडू, व बेडकिहाळ, शमनेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. प्रकाश पाटील यांनी आभार मानले.