राजू पोवार : रयत संघटनेचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्याना दिले निवेदन
कोगनोळी (वार्ता) : राष्ट्रीय महामार्गाचे प्राधिकरण होणार असून या ठिकाणी कोगनोळी येथील शेतकर्यांची सुपीक जमीन प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जाणार असून शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यासाठी शेतकर्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणचे सहा पदरीकरण करण्याचे काम करावे अशी मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सी. सी. पाटील यांना रयत संघटना यांच्यावतीने देण्यात आले. यावेळी बोलताना चिकोडी जिल्हा रयत संघटना अध्यक्ष राजू पोवार म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाचे होणार्या सहापदरीकरण रस्त्याला शेतकर्यांचा विरोध नसून या ठिकाणी होणार्या अन्य व्यापारी संकुलनास शेतकर्यांचा विरोध असून सहापदरी करण सोडून अन्य जमीन संपादित करू नये अशी जोरदार मागणी या वेळी रयत संघटनेच्या वतीने करण्यात आली.
शासनाला व्यापारी संकुल अंतर करायचे असल्यास सरकारी जागेत करावे. शेतकर्यांची सुपीक जमीन घेऊ नये अशा मागणीचे निवेदन दिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील यांनी सर्व खात्याच्या अधिकार्यांना ताबडतोब शेतकर्यांना विश्वासात घेऊनच काम करावे अशा सूचना दिल्या.
यावेळी बेळगाव जिल्हा रयत संघटना अध्यक्ष राघवेंद्र नाईक, कर्नाटक राज्य रयत संघटना सेक्रेटरी जयश्री गुरनावर, कर्नाटक राज्य रयत संघटना संचालक प्रकाश नाईक, चिकोडी जिल्हा रयत संघटना अध्यक्ष राजू पवार, निपाणी तालुका रयत संघटना युवा अध्यक्ष बाळासाहेब हदीकर, कोगनोळी रयत संघटना अध्यक्ष अनंत पाटील, निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल, सर्जेराव हेगडे, भगवंत गायकवाड, पुंडलिक माळी, अफजल मुल्ला, उमेश परीट, याकूब मुल्ला, अबू मुल्ला यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
गट, तट विसरून शेतकऱ्यांनी एकत्रित यावे
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत जत्राट मध्ये बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …