Monday , December 8 2025
Breaking News

द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्यावर गुन्हे नोंदवा

Spread the love

 

निपाणीत हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन; तहसीलदारांना निवेदन

निपाणी (वार्ता) : सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स, कुष्ठरोग आदी रोगांशी करून तो नष्ट करण्याची भाषा करणारे तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच फेसबूकवरून उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याचा गुन्हा नोंदवून या सर्वांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलना’त करण्यात आली. हे आंदोलन निपाणी येथे कित्तूर राणी चनम्मा चौकात करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार एम. एन. बळीगार यांना निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे म्हणाले, ‘चेन्नई येथे उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘काही गोष्टींना नुसता विरोध करून जमणार नाही, तर त्यांचा समूळ नायनाट केला पाहिजे. डेंग्यूचे डास, मलेरिया, कोरोना, ताप यांसारख्या गोष्टींना केवळ विरोध करून जमत नाही. त्यांना नष्ट केले पाहिजे. ‘सनातन धर्म, म्हणजे देशाला लागलेली कीड आहे’, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे हिंदु धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणार्यांना त्वरित अटक करण्यात यावी. अधिकाधिक हिंदूंनी या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले.
वारकरी महासंघाचे बाबूराव महाजन महाराज म्हणाले, सनातन धर्मावर स्वार्थी राजकारणारी मतांच्या राजकारणासाठी द्वेषपूर्ण विधान करत आहेत. ते बंद करावे. सद्गुरु तावक्वांदा स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी’चे संस्थापक शबबन निर्मळे म्हणाले, भारत सरकारच्या खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण करणार्‍या शासकीय संस्था अस्तित्वात असतांना सरकारने खाजगी इस्लामिक संघटनांना प्रमाणपत्र देण्याचा अधिकार देऊ नये. बजरंग दलाचे जिल्हा संयोजक अजित पारळे म्हणाले, हिंदूंवर अन्याय करणार्‍या हलाल अर्थव्यवस्थेला मान्यता देऊ नये. अन्यथा बजरंग दल या विरोधात रस्त्यावर उतरेल.
या प्रसंगी अभिनंदन भोसले, श्रीराम सेनेचे अमोल चेंडके यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी राजू हिंग्लजे, राजेश आवटे, सचिन तावदारे, प्रसाद जोशी, प्रवीण सूर्यवंशी, राजू सुतार, रोहन राऊत, राजू कल्लोळे, सचिन प्रताप, जुगल वैष्णव, अनिल बुडके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

इचलकरंजी येथील युवकाचा निपाणी जवळ खून

Spread the love  धारदार शस्त्राचा वापर ; मृतदेह टाकला ओढ्यात निपाणी (वार्ता) : इचलकरंजी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *