निपाणी : महाराष्ट्रातील हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरना आग लागल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील कारदगा गावात घडली. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याकडे उसाची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टरना आग लागल्याची घटना काल रात्री घडली. महाराष्ट्रात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू वर्षीच्या उसाला 3500 रुपये आणि गतवर्षीच्या उसाला 400 रुपये प्रति टन जादा भाव द्यावा, अन्यथा साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु करू नये, यासाठी आंदोलन करत आहे. दरम्यान, कर्नाटकातून महाराष्ट्रातील जवाहरलाल साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या 2 ट्रॅक्टरला कारदगा-रेंदाळ रस्त्याच्या मध्यभागी आग लागली. याप्रकरणी ट्रॅक्टर मालकाने सदलगा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta