Monday , September 21 2026
Breaking News

अवकाळी पावसामुळे खानापूरात भात पिकांचे नुकसान

Spread the love

 

खानापूर : आज बुधवारी सकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतात कापून ठेवलेल्या भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच शाळा व कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे व नोकरी निमित्त बेळगावला जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी व नोकरदार वर्गाने आज दांडी मारून घरीच राहण्याचे पसंद केले.

खानापूर तालुक्यात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असून, सर्वत्र भात कापणीला जोर आला आहे. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भात पीक कापून ठेवले होते. परंतु आज झालेल्यात पावसामध्ये ते सापडल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. करंबळ येथे बऱ्याच शेतकऱ्यांनी भात पीक कापून गाद्यात ठेवले होते. परंतु आज झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर्षी पाऊस नसल्याने बऱ्याच भात पिकांचे नुकसान झाले होते. त्यात परत पावसाची भर पडल्याने हातातोंडासी आलेले थोडे कमी प्रमाणात मिळणारे भात पीक सुद्धा वाया गेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *