निपाणी (वार्ता) : बेळगाव विभागातील एलआयसी एजंट वेल्फेअर असोसिएशन बेळगाव विभागाच्या प्रतिनिधींची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा निपाणी येथे झाली. प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव विभागाचे वरिष्ठ विभाग प्रमुख पी. बी. रवी व प्रमुख वक्ते म्हणून वीरेश बसवराज होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव संघटनेचे अध्यक्ष एस. इ. पाटील होते. व्यासपीठावर कैलास भारमल, आप्पाजीगोळ. शेखर शेट्टी,आनंद आरवारे उपस्थित होते.
प्रारंभी एस. इ पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर प्रभाकर चव्हाण यांनी अहवाल वाचन केले. यावेळी एम.डी.आर.टी प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास बेळगाव विभागातील बेळगाव, विजापूर व बागलकोट या तिन्ही जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने विमा प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या चिकोडी शाखेचे शाखा अध्यक्ष सुभाष भादुले, सेक्रेटरी सुशांत मांगलेकर, खजिनदार महेश गावडे, एम. आर. पाटील यांच्यासह निपाणी व चिकोडी शाखेतील विमा प्रतिनिधींनी प्रयत्न केले.
Belgaum Varta Belgaum Varta