निपाणी (वार्ता) : येथील प्रभाग क्रमांक ७ मधील अमाते गल्ली येथे विघ्नहर्ता तरूण मंडळातर्फे साकारण्यात आलेल्या विजयदुर्ग किल्ला प्रदर्शनाचे उद्घाटन येथील समाधी मठातील प्राणलिंग स्वामी यांच्या हस्ते झाले. यावेळी किल्ला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
प्रारंभी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण उर्फ विरु तारळे, माजी सभापती सुनील पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन व आरती करण्यात आली. यावेळी प्राणलिंग स्वामी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रथमेश पाटील यांनी किल्याची माहिती सांगितली.
कार्यक्रमास हालशुगर संचालक संचालक महालिंगेश कोठीवाले, चंद्रकांत पाटील, पांडुरंग सांवत, बाळासाहेब तिप्पे, मल्लिकार्जुन गडकरी, सागर भोसले, अनिल चनन्नावर, संदिप इंगवले, अक्षय मलाबादे, प्रथमेश मलाबादे, ऋशी बेडगे, तुषार दबडे, अरूण दबडे, प्रकाश इंगवले, प्रशात इंगवले, प्रथमेन तिप्पे, ऋ्शी घाटगे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta