Wednesday , March 4 2026
Breaking News

रविकांत तुपकर यांना कर्नाटक राज्य रयत संघटनेचा पाठिंबा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कापूस सोयाबीन आणि ऊसाला खर्चाच्या तुलनेत दर मिळाला पाहिजे, या मागणीसाठी रविकांत तुपकर हे २८ नोव्हेंबर पर्यंत वाट पाहून २९ नोव्हेंबरला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासह मंत्रालयवर मोर्चा काढणार होते. याची माहिती मिळताच आंदोलन करण्यापूर्वीच शनिवारी (ता.२५) तुपकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा निषेध करून कर्नाटक राज्य रयत संघटनेने रविकांत तुपकर यांना पाठिंबा व्यक्त केला.
रयत संघटनेचे कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार म्हणाले, रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीनला हमीभाव मिळावा, यासाठी आंदोलन करीत आहेत. पण मंत्रालयावर मोर्चा काढण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे ऊसाला प्रति टन ५५०० रुपये याशिवाय सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळाला पाहिजे, यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. या पुढील काळात तुपकर यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले.
यावेळी चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष मल्लाप्पा अंगडी, चिकोडी जिल्हा कार्याध्यक्ष विवेकानंद घंटी,
चुनाप्पा पुजारी, शशिकांत पडसलगी, वासू पढरोळी, महादेव हुलकर, मायाप्पा लोरूरे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *