Sunday , September 8 2024
Breaking News

गरम कपड्यांचा व्यवसाय थंडच!

Spread the love

 

ग्राहकांच्या प्रतीक्षेत विक्रेते : थंडीअभावी व्यवसायावर परिणाम

निपाणी (वार्ता) : नोव्हेंबर महिन्याचा पंधरवडा संपूनही अद्याप थंडी वाढलेली नाही. त्यामुळे निपाणी शहरातील गरम कपड्यांच्या बाजारात ग्राहकांची वर्दळ सध्या कमी दिसून येत आहे. त्यामुळे अशोकनगर, जुना पीबी रोड, साखरवाडी, बेळगाव नाका परिसरात असलेल्या गरम कपड्यांच्या स्टॉलवर सन्नाटा पसरल्याचे चित्र आहे.
नोव्हेंबर महिन्यात चांगली थंडी पडते. यंदा अजूनही तेवढी थंडी जाणवत नसल्याने स्वेटर, मफलर, ऊनी टोपी, शाल आदींची विक्री मंदावली आहे. ग्राहक येत नसल्याने विक्रेते अस्वस्थ झाले आहेत. साधारणपणे नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत शहरात थंडी असते. यंदा नवरात्रीनंतर काही दिवस किंचित थंडी पडली. तेव्हा थंडी वाढणार असे वाटत होते. पण थंडीने जोर पकडला नाही. त्यामुळे बाजारपेठ थंड आहे. या बाजारपेठे शिवाय थंडीत गरम कपड्यांचा व्यवसाय करणारे व्यापारीही चिंतेत सापडलेले आहेत. सध्याचे वातावरणात काही प्रमाणात उष्ण असल्याने गरम कपड्यांची विक्री आतापर्यंत केवळ १५ ते २० टक्केच झाली आहे. अशीच स्थिती राहिल्यास विक्रेत्यांचा हा हंगाम तोट्यात जाण्याची शक्यता आहे.
वातावरणातील बदलामुळे या हंगामी व्यवसायावर परिणाम झाला आहे. जोपर्यंत चांगली थंडी पडणार नाही तोपर्यंत व्यापार होणार नाही. राज्यात कुठेही गारवा वाढला नसल्याने सध्यातरी थंडी वाढणार नाही, अशी परिस्थिती आहे.
————————————————————–
‘गेल्या वर्षीचा गरम कपड्यांचा काही स्टॉक अनेक व्यापाऱ्यांकडे पडून आहे. त्यात आता नव्या स्टॉकची भर पडल्याने व्यापारी चिंतेत सापडले आहेत. यंदा थंडी दगा देणार असल्याचे संकेत मिळाले असल्याने गरम कपडे खरेदी करण्याची जोखीम अनेक व्यापाऱ्यांनी घेतलेली नाही.’
-सुरज जवाने, स्वेटर, गरम कपडे विक्रेते, सांगली

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *