Sunday , December 14 2025
Breaking News

पावसाचे नव्हे, नळाचे पाणी

Spread the love

 

बस स्थानकात दलदल; तोट्या खराब झाल्याने नंतर पाणी वाया

निपाणी (वार्ता) : येथील बस स्थानकाच्या निर्मिती वेळी चालक वाहकासह प्रवासासाठी आजाराच्या इमारती जवळच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. पण तोट्या खराब झाल्याने गेल्या दोन दिवसापासून नळाचे पाणी वाया जात आहे. सदरचे पाणी बस स्थानक आवारात पसरत असल्याने निर्माण झाले असून त्यातूनच प्रवाशांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत असून तात्काळ तोट्यांची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशातून होत आहे.
बस स्थानकात कुपनलिका खोदली असून नळ बसवून त्याद्वारे प्रवाशासह चालक वाहकांना पाण्याची सोय केली आहे. पण निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकच्या तोट्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे पाणी निरंतरपणे वाया जात आहे. प्रवासी आणि बस थांबण्याच्या ठिकाणी पाणी साठत असल्याने दलदल निर्माण झाली आहे. त्यातूनच प्रवासी ये-जा करीत आहेत. या सततच्या पाण्यामुळे आगार परिसरात अनेक लहान मोठे खड्डे पडले आहेत. याबाबत वृत्त प्रसिद्ध करूनही आगारप्रमुखांनी दुर्लक्ष केले आहे. परिणामी खड्ड्यांच्या आकारात वाढ झाली आहे.
—————————————————————-
भविष्यात आगारात पाणीटंचाईची झळ
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भविष्यात कुपनलिका, विहिरींना पाण्याची झळ बसणार आहे. अशा परिस्थितीमध्ये बस स्थानकात निरंतरपणे पाणी वाया जात असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
——————————————————————
‘आगारात असलेल्या नळाचे पाणी निरंतरपणे सुरू असल्याने बस स्थानकात पाणी पसरले आहे. या दलदलीतूनच प्रवाशांना वाट काढावी लागत आहे. त्याकडे आगार प्रमुखांनी लक्ष द्यावे.’
-राजन चिकोडे, माजी सभापती, निपाणी
——————————————————————
‘आठ दिवसांपूर्वी येथील नळाच्या तोट्या खराब झाल्या आहेत. त्यातून सतत पाणी जात असल्याने आगाच्या आवारात पाणी पसरत आहे. याची कल्पना संबंधित कंत्राटदारांना दिली असून लवकरच त्याची दुरुस्ती केली जाईल.’
-संगाप्पा, आगारप्रमुख, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘रयत’ ची विधानसभेला धडक निपाणीत चाबूक मोर्चा; तहसीलदारांना निवेदन

Spread the love  निपाणी (वार्ता) : ऊस पिकापासून सरकारला जाणाऱ्या करातून प्रति टन उसाला किमान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *