उपनिरीक्षिका कृष्णवेणी गर्लहोसुर : डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : समाजात लहानाचे मोठे होऊन अनेक जण उच्च पदावर कार्यरत आहेत. पण अनेकांना समाजाचे भान राहत नाही. नोकरी-व्यवसायात गुंतल्याने समाजाचा विसर पडतो. पण ज्या समाजात जन्मतो त्या समाजाचे ऋण फेडणे आवश्यक आहे, असे मत निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षिका कृष्णवेणी गर्लहोसुर यांनी व्यक्त केले. येथील डॉ.आंबेडकर विचार मंच आयोजित विविध क्षेत्रात काम करणार्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. अच्युत माने होते.
प्रारंभी कपिल कांबळे व सहकार्यांनी बुद्ध वंदना सादर केली. यावेळी अजित शिंदे यांची सीबीआय इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती, सचिन कांबळे यांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच निपाणी नगरपालिकेचे सफाई कर्मचार्याचा मुलगा ऋतुराज विशाल मधाळे यांनी डॉक्टरेट पदवी घेल्याबद्दल संघटनेच्यावतीने या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.
डॉ. अच्युत माने यांनी समाजामध्ये एकीकडे भोग वादाचा उच्छाद मांडलेला आहे. दुसरीकडे मात्र या भयानक परिस्थितीमध्ये या सत्कार मूर्तीनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर उत्तुंग यश प्राप्त केले आहे. म्हणून हा आदर्श समाजाने घेऊन आपली प्रगती करून इतरांना प्रेरणा देण्याचे आवाहन केले.
संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुरेश कांबळे यांनी आंबेडकर विचार मंचच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन व समाजाला दिशा देण्याचे काम अखंड राहणार असल्याचे सांगितले. मोहन घस्ते, मिथुन मधाळे, सातापा कांबळे, रतन पोळ यांनी मनोगत व्यक्त केले. सत्कार मूर्तीनी कृतज्ञता व्यक्त केली. अमित शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश मधाळे यांनी स्वागत केले.
कार्यक्रमास अशोक लाखे, गणू गोसावी, किसन दावणे, सुधाकर माने, संदीप माने, पिंटू माने, बबन भोसले, बाबू माने, राहुल भोसले, साजन घस्ते, अभिजीत कांबळे, कैलास ढाले, प्रतीक मधाळे, प्रणित घस्ते, जितेंद्र कांबळे यांच्यासह मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते. दीपक शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण माने यांनी आभार मानले.
Check Also
येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त निपाणी चर्चमध्ये विविध कार्यक्रम
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील कोल्हापूर वेसवर असलेल्या बागेवाडी कॉलेजसमोरील चर्चमध्ये बुधवारी (ता. …