Wednesday , April 17 2024
Breaking News

जोल्ले दाम्पत्यांच्या विरोधात सदलगा पोलीस ठाण्यासमोर निदर्शने

Spread the love

पदाचा गैरवापर केल्याचा आरोप : कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल
निपाणी (वार्ता) : बोरगाव नगरपंचायत निवडणुकीदरम्यान 26 डिसेंबर रोजी भाजप पक्षाचे बाहेरगावच्या कार्यकर्त्यांमध्ये व बोरगाव येथील नागरिकांमध्ये किरकोळ वादावादीचा प्रकार घडला होता. निवडणुकीत पैसे वाटप आवरण हा वाद निर्माण झाला. यावेळी काही भाजप कार्यकर्ते बोरगाव येथील आठ जणांवर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केले होते. या सर्वच युवकांना जामीन मिळाला असून त्यांची सुटका झाली. मात्र हाच मुद्दा डोळ्यासमोर ठेवून जोल्ले दाम्पत्य आपला पदाचा गैरवापर करीत विनाकारणच बोरगाव शहरातील काही युवकांचे नावे खोटे गुन्हा दाखल करून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलीस बळाचा वापर करून रात्री-अपरात्री युवकांचे धरपकड चालू आहे. निष्पाप युवकांवर खोटे गुन्हे दाखल करीत असल्याच्या आरोपावरून आज पहाटे युवा नेते उत्तम पाटील, शहरवासीय व नवनिर्वाचित नगरसेवकांनी सदलगा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत जोल्ले दाम्पत्यांचा निषेध व्यक्त केला.
पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या असंख्य महिला व शहरवासीयांनी मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विरोधात घोषणा देत अधिकाराचा गैरफायदा थांबला पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असा आग्रह धरला.
घटनास्थळी माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी धाव घेऊन आपण न्यायाच्या बाजूने दाद मागू. उपोषण मोर्चाद्वारे दाद किंवा न्याय नको. पोलीस जिल्हाप्रमुख व जिल्हाधिकार्‍यांच्याकडे जाऊन मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले विरोधात तक्रार करून निरपराध युवकांची सुटका करु असे आश्वासन दिले.
यावेळी माध्यमांशी बोलताना माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी, एकसंबा व बोरगांव येथे झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपा दारुन पराभव झाला व त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे त्यांनी पोलीस बळाचा वापर करीत निष्पाप युवकांना निवडणुकीच्या मुद्द्यावरून खोटे गुन्हे दाखल करीत आहेत. त्यांचे हे षड्यंत्र शहरवासीय कधीच खपून घेणार नाहीत. यापुढे निपाणी मतदारसंघात आपण युवा नेते उत्तम पाटील यांना संपूर्ण साथ देऊन गुन्हा दाखल झालेल्या युवकांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
युवा नेते उत्तम पाटील यांनी, बोरगाव नगरपंचायत निवडणूक दरम्यान, प्रचाराचा वेळ संपला असला तरीही भाजप नेते व कार्यकर्त्यांनी बोरगाव येथे येऊन, शांत असलेले वातावरण बिघडून गेले. मात्र शहरवासीय निवडणुकीत सत्याच्या व न्यायाच्या बाजूने कौल दिला. त्यांचा पराजय झाला म्हणून त्यांनी निष्पाप लोकांना पकडून त्यांच्यावर खोटे केस दाखल करीत आहेत. निवडणूक झाल्यानंतर आठ जणांवर गुन्हा दाखल केले. त्या चार जणांना जामीन मिळून आपण त्यांची सुटका केली आहे. मात्र त्यातही समाधान न मिळाल्याने पुन्हा प्रकरणात संबंधित नसलेल्या युवकांवर कारवाई करण्यासाठी रात्री-अपरात्री पोलिसांनी धरपकड चालू ठेवली आहे. पोलिसांनी मंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे त्यांचे काम त्यांनी करावे त्यासाठी पोलिसांनी योग्य ते पाऊल उचलावेत, असे मत यावेळी व्यक्त केले.
अनिता मगदूम यांनी, आमच्या पतीची कोणतीही चूक नसताना पोलीस रात्री घेऊन आमच्या घरी झाडाझडती घेऊन अटक केली आहे. आमच्या घरी कोणीच नाही अशा परिस्थितीत पोलिसांनी पतीवर दबाव टाकून त्यांना अटक केली आहे. महिलांना संरक्षण देण्याचे कार्य लोकप्रतिनिधीचे असते. पण या ठिकाणी कोणतीच संरक्षण महिलांना मिळत नसल्याचा खंत व्यक्त केली.
यावेळी नूतन नगरसेविक भारती वसवाडे, सुवर्णा शोबाने, वर्षा मनगुत्ते, जावेद मकानदार, पिंटू कांबळे, प्रदीप माळी, रोहित माने-पाटील, सौ. संगीता शिंगे, दिगंबर कांबळे, अभयकुमार मगदूम, तुळशीदास वसवाडे, अश्विनी पवार, माणिक कुंभार, गिरिजा वठारे, शोभा हवले, रुक्साना अपराज, यांच्यासह राजू मगदूम, बाबासो वठारे, अनिल डोंगे, अभयकुमार करोले, सुरेखा घाळे, सांगप्पा ऐदमाळे, अनिल गुरव यांच्यासह शहरवासीय व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिनी लावली २५ हजाराची रोपे

Spread the love  शिक्षक नामदेव चौगुले यांचा उपक्रम निपाणी (वार्ता) : येथील रहिवासी आणि अर्जुनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *