नव्याने थाटला पुनर्संसार; निपाणीत अनेक प्रकरणे निकाली
निपाणी (वार्ता) : निपाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीत समुपदेशन केल्यानंतर चार घटस्फोटीत तर घरगुती भांडणातून विभक्त झालेल्या दोन अशा सहा जोडप्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कागदपत्रांची पूर्तता करून या जोडप्यांचा पुनर्विवाह लावण्यात आला.
यामध्ये चार जोडप्यांनी अर्ज केला होता तर अन्य दोन जोडप्यांनी घरगुती भांडणातून विभक्त होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. वरीष्ठस्तर न्यायाधीश प्रेमा पवारयांनी चार घटस्फोटीत जोडप्यांचा
दावा यशस्वीपणे हाताळून संबंधित जोडप्यांचे समुपदेशन केले. घरगुतीभांडणातून विभक्त झालेल्यांनी अन्य दोन जोडप्यांनी पुन्हा एकत्र येण्याचानिर्णय घेतला. हा दावा कनिष्ठस्तर न्यायाधीश सुनीता पद्मनावर यांनी निकालात काढला.
या अदालतीत एकूण १३ हजार २९३ दावे दाखल झाले होते. त्यातील १३ हजार २८४ दावे निकालात काढले असून याद्वारे १ कोटी २४ लाख ६२ हजार ७३९ रूपयावर तडजोड केली आहे. जोडप्यांना रेशीमगाठीत बांधण्यासाठी पक्षकाराच्यावतीने
ऍड. सुषमा बेंद्रे, ऍड. रणजित पाटील, ऍड. आर. बी. तावदारे यांनी काम पाहीले. यावेळी वकील संघटना अध्यक्ष ऍड. आर.एम. संकपाळ, उपाध्यक्ष ऍड. एन.एम. वराळे, सचिव ऍड. बी. आर. औरनाळे, सहायक सचिव व्ही. व्ही. श्रीपन्नावर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta